69
रावेर (प्रतिनिधी) – रावेर हनीट्रॅप प्रकरणात अटकेत असलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील एका प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा हा प्रकार उघडकीस आला होता.
सात-आठ वर्षांपासून संबंधित महिला आणि पीडित व्यक्तीचे संबंध होते. महिलेने त्याच्या खासगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण करून वेळोवेळी पैशांची मागणी केली. अखेर, हा “पारसमणीचा” खेळ संपला असून, आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. दोघेही मागील चार दिवसांन पासून पोलिस कोठडीत होते.आज पुन्हा दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.