दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील सावंत नगर भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी आणि रिकाम्या प्लॉट्सवर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी, आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहे.लहान मुले आजारी पडत असल्याच्या घटना वाढत आहे. वारंवार तक्रारी करूनही, कचरा व्यवस्थापनाची योग्य उपाययोजना होत नाही आहे . काही दिवसांआधी युवा सेना आणि इतर संघटनांनी ढोल बजाव आंदोलन नगरपालिकेमध्ये केले होते तसे निवेदन पण नगरपालिका अधिकाऱ्यांना दिले होते तरी पण नगरपालिका स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे .नगरपालिका कोणाच्या दबावा खाली काम करत आहे का ? असा प्रश्न नागरिकां मध्ये निर्माण होत आहे.
दौंड नगरपालिकेच्या संबंधित विभागांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन, सावंत नगरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलावीत .