आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे आरोप प्रकरणी मोठी धक्कादायक माहिती सभागृहात उघड केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या आरोपींचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी फोन कॉल केले असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले असून यात सगळे लोक शरद पवार गटाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना हा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आरोपीने जो कट कारस्थान रचला त्यांचे पुरावे सापडले आहेत.
यात सगळे लोक शरद पवार गटाचे लोक सामील आहेत. प्रभाकरराव देशमुख, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स आहेत. त्यांनी अटकेत असलेला पत्रकार तुषार खरात यांना कॉल केले आहेत आणि नंतर त्याने व्हिडिओ करून यांना पाठविले आहेत. या सर्वांची चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.