Home लेटेस्ट न्यूज दौंडमध्ये संतापजनक घटना: बरणीमध्ये आढळले सात ते आठ अर्भकांचे मृतदेह

दौंडमध्ये संतापजनक घटना: बरणीमध्ये आढळले सात ते आठ अर्भकांचे मृतदेह

by krish
0 comments

पुणे जिल्ह्यामधील दौंड शहरातील बोरावले नगर भागा तील कचऱ्यात बरणीमध्ये ७ ते ८ अर्भकांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस पुढे आली आहे. स्थानिक रहिवाशांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यांना कचऱ्यात फेकण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. ते अर्भक मुलींचे असण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप आणि अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here