78
विधानभवनातील दालनात कोल्हापूरमधील आमदारांच्या विशेष बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारक उभारणीसाठी नगरविकास विभागाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच त्याचा जी आर कोल्हापुरातील आमदाराच्या हाती सुपूर्त करण्यात आला आहे.या निधीमुळे पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची लाखो शिवप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे.पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी संबंधित असल्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक आहे. शिवस्मारकाच्या उभारणीमुळे पन्हाळा किल्ल्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होईल, तसेच पर्यटनालाही चालना मिळेल.