83
नांदेड जिल्ह्याच्या आष्टी गावच्या शेतात कच्ची हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत .
कच्ची हळद शिजवत असताना हळदीच्या कुकरमध्ये जास्त दाब निर्माण झाल्याने त्याच वेळी कूकरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की, कुकरचे अक्षरशः तुकडे तुकडे होऊन दूर दूर पर्यंत जाऊन पडले.तब्बल 550 ते 600 फूटांपर्यंत कुकरचे तुकडे उडून गेले. यात चार शेतकरी गंभीर जखमी आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरु आहेत.सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.