82
महायुती सरकारने महिलांना लाडकी बहिण योजनेतून दरमहा १५०० रुपये देत आहेत .आता या योजने पाठोपाठ बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामकागारांना आता निवृत्ती वेतन मिळणार आहे. या योजनेत दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे, याबद्दल कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.