Home लेटेस्ट न्यूज वरणगावातील सैनिकाचा आसाममध्ये मृत्यू

वरणगावातील सैनिकाचा आसाममध्ये मृत्यू

by sandy
0 comments

( गुरुवारी वरणगावात शासकीय इंतमामात होणार अंतीम संस्कार )

जळगाव वरणगाव प्रतिनीधी ,
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील सम्राट नगर मधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान दहा युनिट महार रेजिमेंट नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर वय ३५ यांचे अरुणाचल प्रदेश येथे देश सेवा बजावत असतांना शहीद झाले.त्यांचे पार्थिव दि २७ गुरुवार रोजी शासकीय इतमामात होणार अंतीम संस्कार

अधिक माहिती अशी कि ,अरुणाचल प्रदेश याठिकाणी रात्रीची गस्त घालत असतांना अर्जुन ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
अर्जुन बावस्कर हे कर्तव्यपरायण आणि शिस्तप्रिय सैनिक होते.आपल्या सेवेत कायम तत्पर असलेल्या या जवानाच्या निधनाने कुटुंबीय,नातेवाईक यांच्यात शोककळा अप्सरली आहे.अर्जुन बावस्कर हे गेली पंधरा वर्षा पासून देशाच्या विविध भागात देशसेवा बजावत होते त्यांच्या सेवानिवृतीला दोन वर्ष बाकी असताना त्यांचे अकस्मत निधन झाले त्यांचा अंत्यविधी दि.२७ मार्च रोजी गुरुवारी, त्यांच्या राहत्या घरून शहरातील मुख्य स्मशानभूमीत शासकीय इतमामात पार पडणार आहे.त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई-वडील, व भाऊ बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून,अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here