पुण्यामधील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडलं आहे. इथं एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या प्रियकराने आधी कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, त्यानंतर चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती. कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढलं. यातून पीडित तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली होती.
दोघंही इथं एका हॉटेलमध्ये राहिले. यावेळी आरोपीनं पीडितेच्या शीतपेयामध्ये गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी आल्यानंतर नंतर आरोपीनं तिच्याशी जबदजस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो कारने पीडितेला पुण्याला घेऊन गेला. इथंही त्यांनी पीडितेवर अत्याचार केला. तमीमने कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या इतर तीन मित्रांना देखील बोलावून घेतलं त्यांनी पण आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रियकर तमीम हरसल्ला खानसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.