Home लेटेस्ट न्यूज शिवसेना पुणे शहर व जिल्हा पदाधिकारी संवाद बैठक मोठ्या उत्साहात संपन्न ..

शिवसेना पुणे शहर व जिल्हा पदाधिकारी संवाद बैठक मोठ्या उत्साहात संपन्न ..

by sandy
0 comments

पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मंत्री मा. उदय सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पुणे शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीत शिवसेनेच्या संघटन वाढवण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली आणि पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी एका ध्येयाने एकत्र येऊन शिवसेनेला आणखी मजबूत करण्याची शपथ घेतली.

विशेष म्हणजे खासदार श्रीरंगआप्पा बारणे,आमदार विजयबापू शिवतारे ,श्रीमती नीलमताई गोऱ्हे, आ.श्री.शरद सोनावणे, श्री.रवींद्र धंगेकर श्री.प्रमोदनाना भानगिरे यांसह पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला समर्पित मार्गदर्शन केले

ज्यामुळे आगामी निवडणुकांसाठी नवा जोश आणि उत्साह निर्माण झाला आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि विश्वास निर्माण करणार्‍या या ऐतिहासिक बैठकीने, सर्व पदाधिकाऱ्यांना एकजुटीची शक्ती दिली आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here