Home लेटेस्ट न्यूज मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची 169 बैठक मध्ये अर्थसंकल्पीय तरतुर्थीला मान्यता देण्यात आली

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची 169 बैठक मध्ये अर्थसंकल्पीय तरतुर्थीला मान्यता देण्यात आली

0 comments

आज वांद्रे कुर्ला संकुल येथील मुख्यालयात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची १५९ वी बैठक पार पडली. यावेळी प्राधिकरणाला ५० वर्षे पूर्ण झाला च्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष बैठकीत महामंडळाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच या बैठकीत एमएमआरडीएच्या ४० हजार १६७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला मान्यता देण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने मुंबईत सुरू असलेल्या विविध मेट्रो मार्गांच्या कामांचा आढावा घेतला. मुंबईतील १४ विकास प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. तसेच मेट्रो मार्गाखालील डेब्रिज आणि राडा रोडा तातडीने हटवून अनावश्यक ठिकाणी असलेले बेरिकेड्स हटविण्याचे निर्देश दिले. तसेच मेट्रो मार्गाखालील परिसर स्वच्छ करून त्याठिकाणी बगीचा विकसित करण्याचे निर्देश देखील याप्रसंगी दिले.
या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच एखादा नोडल अधिकारी नेमून हे काम झाले आहे की नाही याचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

तसेच नव्याने तयार होत असलेला मेट्रो-५ मार्गात बदल करून ती खडकपाडा मार्गे बदलापूरपर्यंत नेण्याचे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर पूर्णविकासाचा आढावा घेऊन या मार्गाला गती देण्याचे निर्देशही यासमयी दिले. बिकेसी कोंडीमुक्त करण्यासाठी माहीम ते बिकेसी नवीन खाडीपूल तयार करण्याच्या सूचना बीएमसी आयुक्तांना दिल्या.

ठाणे जिल्ह्यातील दहेरजे धरणासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे ठाणे, कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदरला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील रायलादेवी तलावाच्या टप्पा-२ ची कामे आणि मासुंदा तलावातील प्रस्तावित म्युझिकल फाउंटन प्रकल्पाचा आढावा घेतला. तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता गायमुख ते फाउंटनपर्यंत ३० मीटर पर्यंत रुंद करण्याचा कामाचा आढावा देखील याप्रसंगी घेण्यात आला.

यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो रुबल अग्रवाल, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच एमएमआरडीएचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Search Here