Home लेटेस्ट न्यूज मुक्ताईनगर मध्ये आशा स्वयंसेविका दिनाच्या आयोजन

मुक्ताईनगर मध्ये आशा स्वयंसेविका दिनाच्या आयोजन

by sandy
0 comments

आज दिनांक 29 3 2025 रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मुक्ताईनगर यांच्यामार्फत आशा स्वयंसेविका दिवसाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्रीमती निशा जाधव या उपस्थित होत्या सन 2023 24 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या प्रथम तीन अशांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक श्रीमती विजया जाधव वडोदा द्वितीय क्रमांक माया जाधव हलखेडा यांचा तर तृतीय क्रमांक आशा गजानन बघे चारठाणा यांना मिळाला माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना आशा स्वयंसेविका यांच्या कामाबद्दल कौतुक करून कोविड काळात केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच उत्तम प्रकारे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अमितकुमार घडेकर डॉ प्रियदर्शी तायडे डॉ सुहास सपकाळ डॉ गणेश गडकळ डॉ सतीश निंभोरे तालुका समूह संघटक सोनटक्के आरोग्य सहाय्यक विजय पाटील व बाळू जयकर तसेच सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

You may also like

Leave a Comment

Search Here