नागपूर मधील पांचपावली परिसरात एका विवाहित तरुणाने 19 वर्षे वयाच्या पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं आपलं नाव बदलून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढळलं, त्यानंतर लॉजवर घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
साहील उर्फ अब्दुल शरीक कुरेशी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.
त्याचा विवाह झाला असून त्याला मुलं देखील आहेत. तो नागपुरच्या चारखंभा चौकात पानटपरी चालवतो. असं असूनही त्याने एका १९ वर्षीय कॉलेजच्या तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीनं एका ट्यूशन समोर तिच्याशी ओळख केली होती. त्यावेळी त्याने आपलं नाव साहिल शर्मा असल्याचं पीडितेला सांगितलं होतं.
अत्याचार केल्या नंतर काही दिवसांनी आरोपीनं आपला पीडित तरुणीला टाळायला सुरुवात केली. शिवाय आपला फोनही बंद ठेवला. यामुळे पीडित तरुणीने आरोपीचा फोटो दाखवत आसपासच्या परिसरात आरोपीचा शोध घेतला, यावेळी आरोपीचं नाव साहिल नसून अब्दुल असल्याचं समोर आलं. यानंतर पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता, आरोपीचा विवाह झाल्याचं तिला समजलं. यानंतर पीडितेनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.