69
आज मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आजवर केलेल्या कामाची माहिती घेतली. तसेच राज्यात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी जागा मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक व्हावी यासाठी काही सूचक सूचना दिल्या. प्रत्येक एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू उपस्थित होते.