पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला भगिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांना शिवसेना पक्षाशी जोडण्यासाठी “घराघरात शिवसेना, मनामनात शिवसेना” ही विशेष सदस्य नोंदणी मोहीम शिवसेना कार्यालय चौफुली येथून सुरू करण्यात आले आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबांचे प्रभावी नेतृत्व राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत स्त्रीशक्तीला संघटित करण्यासाठी आणि पक्षात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शिवसेना थेट नागरिकांच्या दारात पोहोचत आहे. इच्छुक महिला भगिनींनी खालील लिंकवर जाऊन आजच शिवसेना सदस्यत्व नोंदणी करावी:
नोंदणी लिंक: https://shivsenaconnects.in/rrc?QCZVB
या मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हा प्रमुख महेश पासलकर आणि महिला जिल्हा प्रमुख सीमाताई कल्याणकर ,दौंड शहर महिला प्रमुख शितल मंडवाले यांनी सांगितले की, “शिवसेना ही नेहमीच सामान्य जनतेच्या आणि विशेषतः महिलांच्या हितासाठी कार्यरत राहिली आहे. महिला भगिनींनी पुढे येऊन पक्षात सक्रिय सहभाग घ्यावा व आपले प्रश्न, आपले हक्क बुलंद आवाजात मांडावेत, यासाठीच ही विशेष मोहीम आहे.”