Home लेटेस्ट न्यूज मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी सरपंच अवघ्या पाच दिवसात झाल्या अपात्र

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी सरपंच अवघ्या पाच दिवसात झाल्या अपात्र

by sandy
0 comments

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील सरपंच सुपडाबाई भालेराव या सुट्टीवर गेल्यामुळे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी उपसरपंच असलेल्या प्रमिला मनोहर पाटील यांच्याकडे 27-03-2025 रोजी सोपवण्यात आली होती मात्र अवघ्या पाच दिवसातच प्रभारी सरपंच असलेल्या प्रमिला मनोहर पाटील यांना ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ज 3 नुसार जिल्हा अधिकारी यांनी अपात्र घोषित केलेआहे . नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत येथे काही महिन्यापूर्वी तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते तर प्रमिला मनोहर पाटील या चौथ्या अपात्र सदस्या आहे. अशा या अपात्र होत असलेल्या सदस्यांच्या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here