Home लेटेस्ट न्यूज भोर मध्ये महिला शिक्षिकेचे निलंबन

भोर मध्ये महिला शिक्षिकेचे निलंबन

by krish
0 comments
Bhor: Female Teacher Suspended

पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये एका महिला शिक्षिकेचा शाळेत मोठा प्रकार उघडकीस आला आहे .

शिक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही महिला स्वत: शिकवायला जाण्याऐवजी दुसऱ्या महिलेला शाळेत शिकवायला पाठवायची. आणि हजेरी पाटावर ही सही करायला लावायची.

सीईओ गजानन शिंदे आणि प्रशासकीय अधिकारी राजकुमार बामने भोरच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एकमध्ये अचानक निरीक्षण करायला पोहोचले, तेव्हा शाळेमध्ये नियुक्त महिला शिक्षिका भारती मोरे कोणतीही पूर्वसूचना न देता सुट्टीवर होत्या, पण शिक्षकांच्या हजेरी पटावर त्यांची सही होती. ही सही खोटी असल्याचंही अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता समोर आलं.

आरोपी महिला शिक्षिकेचं नाव भारती दीपक मोरे असं आहे. अनुपस्थित महिला शिक्षिकेच्या ऐवजी शाळेमध्ये दुसरी महिला शिकवत असल्याचं तपासात समोर आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारती मोरेने तिच्या जागी नियुक्त केलेल्या महिलेला ठराविक पैसे देत होती, याबदल्यात त्या महिलेला भारती मोरे ऐवजी शाळेत जाऊन शिकवायचं होते.

याप्रकरणी शालेय अधिकाऱ्यांनी भारती मोरेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, पण या नोटीसला समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे भारती मोरे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here