Home लेटेस्ट न्यूज खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा रावेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा निषेध;

खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा रावेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा निषेध;

by sandy
0 comments

रावेर तहसील कार्यालयात आंदोलन करत निवेदन

रावेर (प्रतिनिधी): राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात कुठलेही ठोस पुरावे नसताना, आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरून केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध रावेर भाजपाच्या वतीने करण्यात आला. याविरोधात तहसील कार्यालयात निदर्शने करण्यात आली तसेच तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

रावेर भाजपाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार खडसे यांनी अश्लील भाषेचा वापर करून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे, जो अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.खडसे यांच्या वक्तव्यातून त्यांचा खरा चेहरा समोर आला असून, त्यांची भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रदेश सदस्य सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील, चंदु पाटील (के-हाळा), महेंद्र पाटील, चेतन पाटील, दुर्गादास पाटील, अजिंक्य वाणी, बाळा आमोदकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Search Here