70
नागपूर चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इतनकर यांनी जिल्हा नियोजन सभागृहात जाहीर केले की, नागरिकांच्या तक्रारी किंवा अडकलेली कामे आता फक्त ७ दिवसांत सोडवली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हॉट्स ॲप चॅटबोटद्वारे तक्रारी व अडकलेली कामे नोंदवता येणार असून, ‘सुविधा संवाद सेतू’ या नावाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यात रस्ते, पाणी, स्वच्छता आणि यासारख्या ३५ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.