पुण्याच्या हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्याचे समजतेय.
केंद्रीय मंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांना घरी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटू शकतो, असे म्हटले जातेय.
केंद्रिय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करणार , असेही राजकीय परीक्षक सांगत आहेत.
अमित शाह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे.
आज अमित शाह यांच्यासमोरच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये पालक मंत्री पदाचा मार्गे सुटणार असे वर्तवले जात आहे.