Home लेटेस्ट न्यूज रावेर परिसरात वादळ, पावसाचा कहर – गारपिटीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

रावेर परिसरात वादळ, पावसाचा कहर – गारपिटीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

by sandy
0 comments

राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने ट्रॉफिक जाम

रावेर(प्रतिनिधी): रावेर शहरासह परिसरात आज दुपारी अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. काही भागांत गारपिटीने देखील हजेरी लावली असून नागरीकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वादळामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असून काही ठिकाणी वीज ताराही तुटल्या आहेत.
अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाच्या तडाख्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत तहसीलदार बंडू कापसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वादळ, पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.”वादळी हवामानामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे.

 

You may also like

Leave a Comment

Search Here