Home राजकीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच भगवा झेंडा दिल्लीपासून अटकेपर्यंत फडकला!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच भगवा झेंडा दिल्लीपासून अटकेपर्यंत फडकला!

by krushna
0 comments
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर पार पडलेल्या समाधी स्थळ जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रमाला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या ऐतिहासिक प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना उद्देशून मराठ्यांच्या शौर्याचा गौरव करत हृदयस्पर्शी भाषण केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आपण कोणीही येथे दिसलो नसतो. त्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या तेजस्वी नेतृत्वामुळेच भगव्या झेंड्याचा अंमल दिल्लीपासून अटकेपर्यंत पसरला.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करत फडणवीस म्हणाले, “अमित शाह हे केवळ गृहमंत्री म्हणून नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे अभ्यासक म्हणून रायगडावर आले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “मोगल, आदिलशाही, कुतुबशाहीसारख्या परकीय सत्ता देशात असताना जिजाऊ माँसाहेबांच्या आशीर्वादाने शिवरायांचा तेजस्वी सूर्य उदयास आला. त्यांच्या प्रयत्नांनी स्वराज्याची पहाट झाली.”

शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची भूमिका घेत फडणवीस म्हणाले, “महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे. लोकशाही मार्गाने यासाठी नियम तयार करणार आहोत.”

राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रचण्याचे आणि अरबी समुद्रातील स्मारकासाठी उच्च न्यायालयात लढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी अमित शाह यांची मदत मागितली.

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळासाठी शिवरायांचे १२ किल्ले नामांकनात असल्याचेही त्यांनी नमूद केले. फ्रान्समध्ये यासाठी सादरीकरण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, चंद्रकांत पाटील, ॲड. आशिष शेलार, आदिती तटकरे आणि यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

You may also like

Leave a Comment

Search Here