दौंड (प्रतिनिधी) — दौंड शहरातील महावितरण कार्यालयात नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरातील अनेक नागरिकांच्या घरातील वीज मीटरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना दर महिन्याला दुप्पट व तिप्पट बिल आकारले जात आहे. या संदर्भात ऑफलाईन आणि ऑनलाईन तक्रार केली आणि 260 रुपये मिटर चेक साठी करूनही तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे, परंतु महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
वास्तविक, मीटर बिघाडाची जबाबदारी महावितरणची असून, चुकीच्या बिलामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार केल्यासदेखील अधिकारी टाळाटाळ करतात , अधिकारी पण अनुपस्थित असतात, विचारणा केली असता अधिकारी व्हिजिटला गेले आहे असे सांगितले जाते ,ज्यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि मीटर दुरुस्ती व बिल दुरुस्तीची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी.