भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दौंड शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सरपंचवस्ती, शालिमार चौक, गोल राऊंड यासह संपूर्ण शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये सर्व धर्माच्या लोकांनी सहभाग घेऊन एकतेचा सलोखा कायम ठेवला आहे.
या कार्यक्रमांमध्ये सर्व राजकीय आणि अराजकीय संघटनांनी सहभाग घेतला. तसेच नगरपालिका ,पोलिस प्रशासनाच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले. प्रभातफेर्या, पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्याने आयोजित करून बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शहरातील नागरिकांनी आकर्षक रोषणाई, सजावट ,डीजे, आणि सांस्कृतिक पद्धतीने मिरवणुकांच्या माध्यमातून आपला आदरभाव व्यक्त केला.
लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या उत्सवात पाठोपाठ भाग घेत बाबासाहेबांच्या कार्यास व विचारांना अभिवादन केले.