42
पिंपरी चिंचवड (पुणे) येथे खेलो इंडिया मान्यताप्राप्त रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली. या अकादमी मध्ये लहान वयात प्रचंड जिद्द, सरावमध्ये असलेली शिस्त आणि मोठं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणारे हे खेळाडू पाहून मन भारावून जाते.
रुस्तम-ए-हिंद पै.श्री.अमोल बुचडे यांचे या क्षेत्रातील योगदान आणि युवांना देण्यात येणारी दिशा वाखाणण्याजोगी असून, त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित युवा मल्लांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.