मुक्ताईनगर शिक्षण मंडळ प्रसारक संचलित, स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, मध्ये विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा प्रथम केंद्रबिंदू मानून त्या दिशेने शाळा ही सदैव प्रयत्नरत असते.
संस्थेचे अध्यक्ष मा. आर एम खाचने,मा. श्रीमती रक्षाताई खडसे शाळेच्या सचिव तथा केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा विभाग भारत सरकार आणि सर्व संचालक मंडळ यांच्या उत्तम सहकार्य व मार्गदर्शनाचा लाभ घेत शाळा ही उत्तरोत्तर आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा माध्यमिक स्तरावरचा महाराष्ट्र शासनाचा गुणगौरव व मानचिन्ह तथा तीन लाख रुपयाच्या धनादेशाचा सन्मान प्राप्त झाला.
शाळा ही प्रत्येक वर्षाला असंख्य असे विद्यार्थी केंद्रित शालेय उपक्रम राबवत असते तसेच उत्तम दर्जाचे शिक्षण देत असल्यामुळेच शाळेच्या विद्यार्थी संख्येत वर्षानुवर्ष शेकडो विद्यार्थ्यांची भर पडत आहे याला अपवाद नाही.
दर वर्षाप्रमाणे असंख्य स्पर्धा परीक्षा व उपक्रमांच्या अंतर्गत एक प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा शाळेमध्ये राबवली जाते आणि ती म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला क्षेत्रातील विविध अशा स्पर्धा परीक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासाला एक चालना देणाऱ्या ठरतात अशा परीक्षांचे आयोजन रंगोत्सव सेलिब्रेशन फाउंडेशन मुंबई, यांच्या अंतर्गत शाळेत घेतल्या जातात गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शाळेतील 350 विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व विविध अशी सन्मानचिन्हे, पारितोषिके, बक्षिसे पटकाविली.
रंगोत्सव सेलिब्रेशन फाउंडेशन तर्फे यावर्षी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या गेल्या व या स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर, शाळेचे कला शिक्षक अमोल सुतार सर आणि इतर सहकारी शिक्षक यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली या स्पर्धा परीक्षेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद अशी कामगिरी करत शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा समजला जाणारा “ग्लोबल स्कूल अवार्ड” प्रदान करण्यात आला तर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पारितोषिके, बक्षिसे या ऑर्गनायझेशन तर्फे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
परिधी हर्षद झोपे या विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा मल्टी कलर एलसीडी रायटिंग पॅड विथ ट्रॉफी पटकावित द्वितीय क्रमांकाचा मान शाळेसाठी मिळवलेला आहे.
भार्गवी सुरेश देवरे हिने तृतीय क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोट एक्सटेंड स्मार्ट वॉच विथ ट्रॉफी हा पुरस्कार पटकाविला आहे.
अमित पंकज कोळी या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी शेड एलसीडी लॅम्प म्युझिक सिस्टीम विथ ट्रॉफी प्राप्त करत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तो ठरलेला आहे.
मधुश्री गिरीश चौधरी, प्रियांका गजानन पाटील, स्वस्तिक सदानंद कुंभारकर, आणि राम प्रवीण हिरालकर या चारही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील “स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स अवॉर्ड व ट्रॉफी” देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
वैष्णवी प्रताप पाटील, विना रवींद्र तळले, उज्वला गौरव सपकाळे, अंशू रवींद्र बोंबले, परी पंकज तारू, अंकिता सतीश सावळे, विशाखा देवेंद्र काटे, तेजराज गोकुळ चित्ते, तुर्वी राहुल पाटील व प्रीती शशिकांत पानपाटील या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेडले तथा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे अशा गुणवंत, बुद्धिमंत, चाणक्ष ,कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा शाळेचे मुख्याध्यापक व्ही के वडस्कर, अमोल सुतार सर व सर्व सहकारी शिक्षक आणि सन्माननीय पालकांचे कौतुक व अभिनंदन शाळेच्या सचिव मा. श्रीमती रक्षाताई खडसे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री, भारत सरकार शाळेचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे.