Home लेटेस्ट न्यूज “ग्रामविकास विभागाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार श्री. मिलिंद लोणारी यांना; तिसऱ्यांदा राज्यस्तरावर गौरव”

“ग्रामविकास विभागाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार श्री. मिलिंद लोणारी यांना; तिसऱ्यांदा राज्यस्तरावर गौरव”

by sandy
0 comments

ग्राम विकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात, अशा काही योजना प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्याचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते. असे प्रकल्प पूर्ण करताना अधिकारी / कर्मचाऱ्यामधील विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते. अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय, दिनांक २ सप्टेंबर २००५ अन्वये सन २००५-२००६ पासून सुरु केली आहे. त्यानुषंगाने सन २०२२- २३ यावर्षी ग्राम विकास विभागातील मंत्रालयातील (खुद) व क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्काराची घोषणा ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आली आहे, यामध्ये श्री मिलिंद मनोहर लोणारी, आरोग्य सेवक, पंचायत समिती, धरणगाव यांची गुणवंत कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

श्री मिलिंद मनोहर लोणारी, आरोग्य सेवक यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृह येथे महाराष्ट्र राज्याचे मा जी मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.दिपक सावंत साहेब यांच्या हस्ते श्री लोणारी यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि एक लाख रु रोख अश्या स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव येथील सेवा कालावधीत श्री मिलिंद लोणारी यानी कार्यालयाने त्यांच्यावर सोपवलेली जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी पदाची जबाबदारी पूर्ण करत आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनाची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करून त्याचप्रमाणे कोविंड आपत्तीच्या परिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राज्य आरोग्य व शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे सहाय्यक संचालक यांच्या हस्ते राज्यस्तरावर प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार गुणगौरव करण्यात आला होता.

त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने आता तिसऱ्यांनदा गुणवंत कर्मचारी म्हणून श्री मिलिंद लोणारी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे, त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here