Home लेटेस्ट न्यूज बारामतीच्या युवा उद्योजक अनिकेत मिंड यांची राष्ट्रीय पातळीवर दखल : स्टार्टअप स्पर्धेत प्रथम क्रमांक, १० लाखांचे अनुदान

बारामतीच्या युवा उद्योजक अनिकेत मिंड यांची राष्ट्रीय पातळीवर दखल : स्टार्टअप स्पर्धेत प्रथम क्रमांक, १० लाखांचे अनुदान

by sandy
0 comments

बारामती येथील युवा उद्योजक अनिकेत गोरख मिंड यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप महारथी चॅलेंज स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत छाप सोडली आहे. ॲग्रीटेक क्षेत्रातील त्यांच्या स्पार्क ऑग्रो या स्टार्टअपने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केलेल्या नवोन्मेषी कामगिरीचे देशपातळीवर कौतुक झाले असून, केंद्र सरकारकडून त्यांना १० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये आयोजित या स्पर्धेत देशभरातून तब्बल ३,९०० स्टार्टअप सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते अनिकेत यांचा गौरव करण्यात आला.

अनिकेत मिंड हे शेतकरी कुटुंबातून आलेले असून, शेतीतील प्रत्यक्ष अनुभव आणि आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी किमतीची शेती अवजारे तयार करण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०१९ मध्ये बारामती एमआयडीसीमध्ये त्यांनी स्पार्क ऑग्रो या नावाने स्टार्टअप सुरू केले.

या कंपनीतर्फे पॉवर टिलर, पॉवर वीडर, स्प्रे पंप्स तसेच अन्य शेती उपयोगी यंत्रसामग्रीचे उत्पादन व वितरण केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी शॉपिफाय स्टोअरद्वारे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवली आहेत.

स्टार्टअप सुरू झाल्यानंतर लगेचच कोविडसारख्या जागतिक संकटाचा सामना करावा लागला, मात्र चिकाटी, नवसंकल्पना आणि ग्रामीण भागातील अनुभवाच्या जोरावर अनिकेत यांनी या काळातही आपले कार्य अखंड सुरू ठेवले.

शेती क्षेत्रात ठोस बदल घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या मान्यतेमुळे बारामतीचे नाव आणखी उज्वल झाले आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here