Home लेटेस्ट न्यूज यावल तालुक्यात गुजरात व मध्यप्रदेश दोन राज्यातुन तस्करीतुन आयात होणाऱ्या लाखो रुपयांच्या गुटक्याची सर्रास विक्री

यावल तालुक्यात गुजरात व मध्यप्रदेश दोन राज्यातुन तस्करीतुन आयात होणाऱ्या लाखो रुपयांच्या गुटक्याची सर्रास विक्री

by sandy
0 comments

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासुन सर्वाच्च न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या पानमसाला गुटक्याची सर्व नियम धाब्यावर ठेवुन खुल्लेआम विक्री केली जात असुन,असे असतांना मात्र प्रशासनाकडून केवळ देखाव्याची कार्यवाही करण्यात येवुन नंतर लाखो रुपयांच्या विमल गुटक्याची मोठया प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी विक्री होत असल्याचे दिसुन येत असुन ,अन्न व औषद्य प्रशासन विभागाच्या वतीने आर्थिक स्वार्थासाठी गुटक्यावर कोणतीही ठोस अशी कार्यवाही होत नसल्याने प्रशासना च्या कार्यपद्धती बाबत नागरीकांमध्ये संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मानवी जिवनास अत्यंत हानिकारक व कर्करोगाला आमंत्रीत करणारे तंबाखु जन्य पदार्थ व निकोटीन मिश्रीत या घाटक गुटक्याला संपुर्ण देशातील राज्यांमध्ये सर्वाच्च न्यायालया च्या वतीने विक्रीस प्रतिबंधीत करण्यात आलेला गुटका पान मसाला ची यावल तालुक्यात मात्र अगदी राजरोसपणे यावल तालुक्यात शेजारच्या गुजरात आणी मध्यप्रदेश या दोन राज्यातुन तस्करी करून चोरट्या मार्गाने प्रसंगी खाजगी वाहन आणी एस टी बस व्दारे आयात करण्यात येवुन तालुक्यात सर्वत्र बसस्थानक परिसर,शाळा परिसर शहरातील मुख्य बाजारपेठ असो गल्ली बोळातील किराणा दुकान असो अशा सर्व सार्वजनिक ठीकाणी मोठया प्रमाणावर विमल गुटक्याची विक्री करण्यात येत आहे.

अन्न व औषद्य प्रशासन विभाग हे निद्र अवस्थेत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासना कडून तुरळक स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे .यावल तालुक्यात व परिसरात पन्नास ते साठ लाख रुपयांच्या गुटका पानमसाला महीन्याला परराज्यातुन आयात करून विक्रीला जात असतांना अन्न व औषद्य प्रशासन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे त्याच्या कार्यपध्दी बाबत नागरीकांमध्ये संशय व्यक्त करण्यात येत असुन,अन्न व औषद्य प्रशासनाच्या वतीने गुटका विक्रीवर मोठी कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here