43
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दखल घेण्याची मागणी
पहूर ता जामनेर (वार्ताहर)
जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर पहूर नजीक रेल्वे लाईन जवळ खड्डेच खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे .याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे .
जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात दळणवळण वाढले असून रेल्वे लाईन जवळ महामार्गाचे काम बाकी आहे . परिणामी या ठिकाणी कच्च्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे . यामुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही . अनेकदा या ठिकाणी लहान मोठे अपघात झालेले आहेत .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे .