Home लेटेस्ट न्यूज दौंडमध्ये खाटिक गल्लीमध्ये गायींच्या कत्तलीचा प्रकार सुरूच ; घरातून १.५३ लाख रुपयांचे गोमांस जप्त

दौंडमध्ये खाटिक गल्लीमध्ये गायींच्या कत्तलीचा प्रकार सुरूच ; घरातून १.५३ लाख रुपयांचे गोमांस जप्त

by sandy
0 comments

दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात गायींची कत्तल करून गोमांस साठवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ४ मे २०२५ रोजी सकाळी दौंड पोलीसांनी दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे ८५० किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत सुमारे १ लाख ५३ हजार रुपयांचे गोमांस सापडले असून, दोन्ही ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमुने घेऊन तपासणीसाठी सील केले आहेत.

ही कारवाई फिर्यादी अमिर जिलाणी शेख (पो.हवा.) यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. पोलीस निरीक्षक भोसले आणि तपास अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापामारी करण्यात आली.

पहिला छापा दिलीप कांबळे यांच्या घरात टाकण्यात आला. तेथे गोमांस सापडल्यानंतर दिलीप कांबळे यांनी पोलिसांना माहिती दिली की, आलिम शेख आणि आजीम शेख (पूर्ण नाव अज्ञात), दोघेही खाटीक गल्ली, दौंड येथील रहिवासी, यांनी त्यांच्या घरात गोमांस आणून टाकले होते.

यानंतर पोलिसांनी सकाळी ७.४५ वाजता आलिम शेख यांच्या घरावर दुसरा छापा टाकला असता, तेथेही गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस सापडले.

या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 321/2025 नुसार भादंवि कलम 325, तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 5(क), 9(अ), 9(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंडमधील खाटीक गल्ली परिसरात अशा प्रकारचे प्रकार सातत्याने समोर येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here