Home लेटेस्ट न्यूज पुणे शहर पुन्हा एकदा हादरले, कोयता गॅंग पुन्हा सक्रिय !

पुणे शहर पुन्हा एकदा हादरले, कोयता गॅंग पुन्हा सक्रिय !

by sandy
0 comments

पुणे (प्रतिनिधी) :- पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे, पुणे शहर व परिसरात कोयता गॅंग सक्रिय झाली आहे , बिबेवाडी परिसरात १७ एप्रिल रोजी भररस्त्यावर कोयत्याने झालेल्या तुफानी हाणामारीचा थरार समोर आला असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसाचा दरारा कमी झाल्याचे बोलले जात आहे.

या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घटनेनंतर तात्काळ हालचाल करत बिबेवाडी पोलिसांनी या प्रकरणात चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींची नावं सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार आणि सतीश पवार अशी आहेत.

पोलिसांनी या आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर केले. कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाला नकार देत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा पूर्वीपासून गुन्हेगारी इतिहास असून, त्यांना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा पुन्हा गुन्हा करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या बिबेवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हाणामारीचं नेमकं कारण काय होतं याचा शोध घेतला जात आहे. तसेच आरोपींच्या मोबाईलची तपासणी करून त्यांचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली असून, पोलिसांनीही अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं असून, अशा प्रकारच्या हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here