ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कर्करोग निदान मोबाईल बस हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी दुर्गम भागातील नागरिकांची देखील दक्षता घेण्यात येत आहे. दुर्गम भागात, आदिवासी पाड्यात जाऊन ही कर्करोग निदान मोबाईल बस पोहोचत आहे. दररोज किमान १०० रुग्णांची मौखिक, स्तन आणि गर्भाशय कर्करोग तपासणी करण्यात यश मिळत आहे. हा उपक्रम जिल्हा आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
कर्करोग हा अत्यंत गंभीर रोग आहे यामुळे या रोगाची वेळोवेळी तपासणी होणे अत्यावश्यक आहे. या रोगाची तपासणी वेळेत न झाल्यास त्याचे भयंकर परिणाम असतात, परंतु याउलट याची वेळीच तपासणी केल्यास त्यावर त्वरित उपचार करणे शक्य होते. परंतु ग्रामीण किंवा दुर्गम भाग व आदिवासी भागातील नागरिकांना या रोगाच्या चाचण्यांचा खर्च परवडणारा नाही, यामुळे अनेकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा आरोग्य विभागातर्फे ‘कर्करोग निदान मोबाईल बस’ हा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी राबवला जात आहे. अनेक नागरिकांना याचा फायदा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्करोगासारख्या मोठ्या रोगांचा सामना गरीब लोक देखील करत आहेत याकडे लक्ष दिले जात आहे आणि त्यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
उपक्रमाचे उद्घाटन:
या कर्करोग निदान मोबाईल बस उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. ही बस ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ आदी भागात फिरत आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जारी आहे अशी बातमी आहे.
व्हॅनची रचना:
कर्करोग निदान मोबाईल बस सेवेची व्हॅन कर्करोग तपासणीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. व्हॅनमध्ये तपासणी कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच स्तन आणि गर्भाशयातील कर्करोगाची तपासणी करण्यासाठी लागणारे कॉल्पोस्कोप यंत्र देखील ठेवण्यात आले आहे. मुखाचा कर्करोग तपासण्यासाठी डेंटल चेकअपची खुर्ची ठेवण्यात आली आहे. अगदी आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही तपासणी करण्यात येत आहे. तसेच व्हॅनमध्ये दोन तज्ज्ञ डॉक्टरांसह सहा कर्मचारी देखील उपलब्ध आहेत अशी माहिती मिळाली आहे. ही व्हॅन अत्यंत सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
असे आरोग्यविषयक उपक्रम सरकारतर्फे नियमित राबवले जावे, यामुळे अनेक नागरिक स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगू शकतील अशी खात्री निर्माण होते. ठाणे जिह्यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये देखील ही सेवा पुरवण्यात यावी किंवा येथील दुर्गम भागात तसेच आदिवासी पाड्यात देखील अशा प्रकारचे उपक्रम राबवले जावे, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र निरोगी होण्याची शक्यता वर्तवण्यास काही हरकत नाही. कर्करोगासह अनेक रोगांची देखील दक्षता घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
ठाणे जिल्ह्यातील नवा उपक्रम कोणता?
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ‘कर्करोग निदान मोबाईल बस’ हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी दुर्गम भागातील नागरिकांची देखील दक्षता घेण्यात येत आहे. दुर्गम भागात, आदिवासी पाड्यात जाऊन ही कर्करोग निदान मोबाईल बस पोहोचत आहे. दररोज किमान १०० रुग्णांची मौखिक, स्तन आणि गर्भाशय कर्करोग तपासणी करण्यात यश मिळत आहे. हा उपक्रम जिल्हा आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
मोफत कर्करोग तपासणी उपक्रम?
कर्करोग हा अत्यंत गंभीर रोग आहे यामुळे या रोगाची वेळोवेळी तपासणी होणे अत्यावश्यक आहे. या रोगाची तपासणी वेळेत न झाल्यास त्याचे भयंकर परिणाम असतात, परंतु याउलट याची वेळीच तपासणी केल्यास त्यावर त्वरित उपचार करणे शक्य होते. परंतु ग्रामीण किंवा दुर्गम भाग व आदिवासी भागातील नागरिकांना या रोगाच्या चाचण्यांचा खर्च परवडणारा नाही, यामुळे अनेकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा आरोग्य विभागातर्फे ‘कर्करोग निदान मोबाईल बस’ हा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी राबवला जात आहे. अनेक नागरिकांना याचा फायदा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कर्करोग निदान मोबाईल बसची रचना कशी आहे?
कर्करोग निदान मोबाईल बस सेवेची व्हॅन कर्करोग तपासणीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. व्हॅनमध्ये तपासणी कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच स्तन आणि गर्भाशयातील कर्करोगाची तपासणी करण्यासाठी लागणारे कॉल्पोस्कोप यंत्र देखील ठेवण्यात आले आहे. मुखाचा कर्करोग तपासण्यासाठी डेंटल चेकअपची खुर्ची ठेवण्यात आली आहे. अगदी आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही तपासणी करण्यात येत आहे. तसेच व्हॅनमध्ये दोन तज्ज्ञ डॉक्टरांसह सहा कर्मचारी देखील उपलब्ध आहेत अशी माहिती मिळाली आहे.