उन्हाळ्याची सुरुवात म्हणवल्या जाणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यात ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीपासून वाढत चाललेल्या पर्यावरणातील तापमानात आता बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. यावेळी पाऊस देखील पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी किमान व कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. हे ढगाळ वातावरण पुढील दोन दिवस असल्याची संभावना आहे, तसेच पाऊसही पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने पुरवलेल्या माहितीनुसार ईशान्य भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याचाच प्रभाव महाराष्ट्रातील काही जवळच्या राज्यांमध्ये देखील दिसून येणार असल्याचे संभवते. हवामान विभागाने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे परंतु राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये हे वातावरण न पोहोचता तिथे कोरडे आणि शुष्क हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. जरी दोन दिवस वातावरण ढगाळ असेल किंवा पाऊस पडेल तरी दोन दिवसानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आपण उन्हाळ्याची पूर्वतयारी करणे आणि उष्णतेपासून आपला बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे योग्य ठरेल. या ढगाळ वातावरणा नंतर तापमान प्रचंड वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे. याची दखल नागरिक तसेच शेतकऱ्यांनी वेळच्यावेळी घेणे योग्य ठरेल.
पुढील काही दिवस तापमानात घट होणार असून पुढील काही दिवसांच्या तापमानातील बदल आपण यावेळी पाहणार आहोत. २३ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३७.९ असून किमान तापमान १९.९ असणार आहे. यावेळी काही दिवस तापमानात घट होतानाचा इशारा असून त्यानंतर तापमानात अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे याची माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे.
जसजसे प्रदूषण वाढत जात आहे तसतशी निसर्गाची पातळी खालावत आहे. याचा परिणाम ऋतुचक्रावर होत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. वायू प्रदूषण, जल प्रदूषण याचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत आहे याची जाणीव आपण सर्वांनाच हवी. उन्हाळ्यात पाऊस पडतो तर भर पावसाळ्यात कडाक्याची उष्णता जाणवते. ही लक्षणे ग्लोबल वॉर्मिंगला आमंत्रण देणारी ठरत आहेत. प्रदूषणाची वाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची गरज आहे याची प्रत्येक नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि त्याबाबत पाऊल उचलावे.
पुढील काही दिवस वातावरण कसे असेल?
उन्हाळ्याची सुरुवात म्हणवल्या जाणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यात ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीपासून वाढत चाललेल्या पर्यावरणातील तापमानात आता बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. यावेळी पाऊस देखील पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी किमान व कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. हे ढगाळ वातावरण पुढील दोन दिवस असल्याची संभावना आहे, तसेच पाऊसही पडण्याची शक्यता आहे.
आजचे तापमान किती आहे?