मुंबई-पुणे ही विकसनशील शहरं आहेत. पुणे शहरात मुंबई शहरा इतकेच इतर राज्यांमधील लोक स्थलांतरित होत आहेत आणि यामुळे पुणे शहरात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षी पुण्यातील घरांची सरासरी किंमत ७३ लाख रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षात घरांच्या किमतीत ४० टक्क्यांहून जास्त वाढ झाली असल्याची माहिती मिळत आहे. २०२४ मध्ये पुण्यात एकूण ९० हजार घरांची विक्री झाली असून एकूण ६५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार गृहनिर्माण बाजारपेठेत झाला आहे. क्रेडाई पुणे मेट्रो तसेच सीआरई मॅट्रिक्स यांनी पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा गेल्या वर्षीचा आढावा घेणारा अहवाल नुकताच जाहीर केला.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, जनसंपर्क संयोजक कपिल गांधी, व्यवस्थापन समिती सदस्य अभिषेक भटेवारा व पुनित ओसवाल, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता, विदा विश्लेषक राहुल अजमेरा व हिरेन परमार यांच्यासह गृहनिर्माण क्षेत्रातील शंभराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या नुसार गेल्या वर्षी पुण्यात ९० हजार घरांची विक्री झाली. त्यातून एकूण ६५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. हा व्यवहार २०१९ मध्ये ३० हजार कोटी रुपये इतका होता. त्यात आता ११६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यात गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या घरांची किंमत ७३ लाख रुपये आहे. गेल्या पाच वर्षांत घरांच्या सरासरी किमतीत ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे असे या अहवालानुसार समजते. हिंजवडी, खराडी आणि पिंपरी-चिंचवड या परिसरात ७५ टक्क्यांहून अधिक घरांची विक्री झालेली आहे. पुण्यात गेल्या वर्षी एकूण घरांच्या विक्रीत ७० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा हिस्सा ६० टक्के आहे. हा २०२० मध्ये ८५ टक्के होता. गेल्या पाच वर्षांत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री पाच पटीने वाढली आहे. गेल्या वर्षी एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण ३० टक्के आहे. हे प्रमाण २०२० मध्ये ५५ टक्के होते. परवडणाऱ्या घरांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
पुण्यात अतिशय वेगवान पटीने इमारतींचे नवे प्रोजेक्ट्स सुरु होत आहेत. हे प्रोजेक्ट्स अत्यंत आकर्षक आणि लक्षवेधी ठरत आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोची देखील सोय आहे आणि काही ठिकाणी मेट्रोचे काम जोरदार सुरु आहे, या कारणांमुळे हे दर वाढले असल्याची असल्याची दाट शक्यता वर्तवता येते. इतके दर वाढूनही गेल्या वर्षीची घर विक्रीची सरासरी संख्या उच्च आहे. पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाढता विकास या घरांच्या वाढत्या किमतीला कारणीभूत ठरू शकतात.
पुण्यात घरांचे दर किती आहेत?