Home लेटेस्ट न्यूज CSMT रुंदीकरण आणि त्यानुसार बदललेलं रेल्वे शेड्युल!

CSMT रुंदीकरण आणि त्यानुसार बदललेलं रेल्वे शेड्युल!

by sandy
0 comments

गेल्या वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनरल्स स्थानकाच्या रुंदीकरणाचे काम जोमाने सुरु आहे. या स्थानकावरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार मागील वर्षी या कार्यास प्रारंभ झाला. मागच्या वर्षातील जून महिन्यात जसा ब्लॉक जाहीर करण्यात आला होता त्याप्रमाणे याही वर्षी या दोन दिवसात ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यावेळी अनेक शेड्युल्ड गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निलासरे यांनी दिली आहे. पाहूया या प्रकल्पामुळे रेल्वे प्रवासात काय बदल घडणार आहे ते. 


सीएसएमटी स्थानकामध्ये सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी जून महिन्यात यासंदर्भात एक ब्लॉक घेण्यात आला होता. तसाच ब्लॉक यावेळी शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी ते रविवार, दि. २ मार्चच्या सकाळपर्यंत तब्बल १० तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांवर आणि एक्सप्रेसच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या ब्लॉक संदर्भात सर्वच नागरिक चिंतेत असल्याने मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील निलासरे यांनी या ब्लॉकसंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानकावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांची आवक वाढवण्यासाठी स्थानकाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १० पासून प्लॅटफॉर्म क्रमांक १८ पर्यंत २४ कोच गाड्यांसाठी पूर्ण लांबीचे प्लॅटफॉर्म करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे होत आहे. 


मागील वर्षी जूनमध्ये जो ब्लॉक घेण्यात आला होता त्यामध्ये प्लॅटफॉम क्रमांक १० आणि आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ११ ची लांबी वाढवण्यात आली. यावेळी जो ब्लॉक आहे तो प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १४ साठी घोषित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉमचे रुंदीकरण मागील वर्षापासून सुरु आहे, परंतु आता हे काम पुर्णत्वास येत असल्यामुळे दोन दिवसांचा ब्लॉक आवश्यक आहे. शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी ते रविवार, दि. २ मार्च दरम्यान हा ब्लॉक तब्बल १० तासांचा असणार आहे. शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० ते सकाळी ४.३० या वेळेत म्हणजेच तब्बल ५ तास हा ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. तसेच शनिवार, दि. १ मार्च रोजी रात्री ११.१५ ते रविवार, दि. २ मार्च रोजी सकाळी ९.१५ पर्यंत हा ब्लॉक पुन्हा आकारण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानकावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ही बाब लक्षात घ्यावी. 


या ब्लॉकचा सबर्बन रेल्वेवर कमीतकमी प्रभाव पडण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय ब्लॉक दरम्यानच्या एकूण ५९ लोकल गाड्या मध्य रेल्वेद्वारे रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या वेळेत सबर्बन लोकल चालतील, परंतु यासाठी देखील काही बदल घोषित करण्यात आले आहेत. या सबर्बन लोकल मध्य मेन लेनवर भायखळा पर्यंत तर हार्बर लाईन वर केवळ वडाळा रोड स्थानकपर्यंत चालतील अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निलासरे यांनी दिली आहे. 


या ब्लॉक दरम्यान लोकल सेवा हार्बर लेनवरती वडाळा रोड स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानक तर भायखळा पासून  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानक यासाठी ब्लॉक असणार आहेत. या ब्लॉकसाठी लांब पल्ल्याच्या केवळ तीन गाड्या रद्द करण्यात आला आहे. ज्यात दोन गाड्या पुण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानकावर येणाऱ्या गाड्या तर एक गाडी ही नांदेडवरून CSMT ला येणारी ट्रेन रद्द करण्यात आली आहे. या तीनही ट्रेनचा परतीचा प्रवास देखील रद्द करण्यात आला आहे. 


ब्लॉकच्या दोनही दिवसात पनवेल स्थानकावर १ -१ अशा दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येत आहेत. त्या गाड्या परतीचा प्रवास देखील करतील. शुक्रवार, शनिवार तसेच रविवार या दिवसातील १० तासांच्या ब्लॉकमध्ये ३ गाड्यांचा पुण्यापर्यंत प्रवास राहणार आहे. परतीचा प्रवास देखील पुण्यावरून करतील अशी माहिती यावेळी मिळाली आहे. शुक्रवारी ८ गाड्या दादर स्थानकावर थांबवण्यात येतील आणि ३ गाड्या दादरवरून प्रवास करतील, शनिवारी आणि रविवारी सकाळी एकूण १७ गाड्या दादर स्थानकावर प्रवास करतील आणि या लोकलचा दादरवरून परतीचा प्रवास सुरु होईल. यावेळी अनेक लोकल तसेच लांब पल्ल्याच्या ट्रेन्स कॅन्सल करण्यात आल्या आहेत. 

नांदेडवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानकावर येणारी तपोवन एक्सप्रेस, पुणे ते मुंबई डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत प्रत्येक स्थानकावर घोषणा केली जाणार आहे तसेच रिसर्वेशन असल्यास त्या प्रवाशांना मेसेजेसद्वारे माहिती पोहोचवण्यात आली आहे.

ब्लॉकदरम्यान प्रवाशांना अडचण होऊ नये यासाठी ‘बेस्ट’च्या सहकार्याने ऍडिशनल बसेस उपलब्ध करण्यात आला आहे जेणेकरून प्रवाशांना इच्छित स्थळी गंतव्यासाठी कमीत कमी त्रास होईल. 

CSMT ब्लॉक कसा असणार आहे?

गेल्या वर्षी जूनमध्ये जो ब्लॉक घेण्यात आला होता त्यामध्ये प्लॅटफॉम क्रमांक १० आणि आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ११ ची लांबी वाढवण्यात आली. यावेळी जो ब्लॉक आहे तो प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १४ साठी घोषित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉमचे रुंदीकरण मागील वर्षापासून सुरु आहे, परंतु आता हे काम पुर्णत्वास येत असल्यामुळे दोन दिवसांचा ब्लॉक आवश्यक आहे. शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी ते रविवार, दि. २ मार्च दरम्यान हा ब्लॉक तब्बल १० तासांचा असणार आहे. शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० ते सकाळी ४.३० या वेळेत म्हणजेच तब्बल ५ तास हा ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. तसेच शनिवार, दि. १ मार्च रोजी रात्री ११.१५ ते रविवार, दि. २ मार्च रोजी सकाळी ९.१५ पर्यंत हा ब्लॉक पुन्हा आकारण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानकावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ही बाब लक्षात घ्यावी. 

You may also like

Leave a Comment

Search Here