आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महामेट्रोतर्फे ‘महाकार्ड’ सेवा महिलांना फक्त २० रुपयांत देण्याचे घोषित केले आहे. ही सेवा १ मार्च ते ८ मार्चपर्यंत प्रत्येक मेट्रो स्टेशनवर देण्यात येईल. ५०० रुपयांच्या टॉप-अपवर २० रुपयात ‘महाकार्ड प्रत्येक इच्छुक महिलेला देण्यात येणार आहे. यामुळे आता महिलांना स्वस्तात मेट्रोने प्रवास करणे शक्य होत आहे.
दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. या महिलांच्या विशेष दिवशी त्यांना भेट म्हणून महामेट्रोद्वारे एक अत्यंत कौतुकास्पद ऑफर राबवली जात आहे. १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत महामेट्रो द्वारे महिलांना ५०० रुपयांच्या टॉपअप सह फक्त २० रुपयात मेट्रोचे ‘महाकार्ड’ देण्यात येत आहे. ही ऑफर महिलांकरिता अत्यंत उपयोगी ठरू शकते. ‘महाकार्ड’ हे भारतीय स्टेट बँकच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १,०४,८१६ कार्ड विकले गेले आहेत. ‘महाकार्ड’ मेट्रो भाड्यांवर १० टक्के सवलत प्रदान करते.मेट्रोतून प्रवास करताना पुरुषांइतकीच किंवा त्याहून जास्त महिलांची संख्या दिसून येते. कारण मेट्रोचा प्रवास महिलांना सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतो. महिलांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यास, कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचवण्यात मेट्रो अत्यंत उपयोगी ठरते. यासोबतच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांच्या आरोग्याला कसल्याही प्रकारची हानी पोहोचू नये यासाठी मेट्रो सेवा देखील तितकीच तत्परतेने कार्य करत असते. याच काळजीच्या हेतूने मेट्रोतर्फे स्पर्श विहीन व्यवस्थापनाकरिता स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन प्रणाली स्वीकारली आहे आणि ही पुण्यातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रवासी महा कार्डचा उपयोग करून कॅशलेस आणि विनास्पर्श, तसेच सवलतींवर सहज सुलभ प्रवास करू शकतात.
या कार्डची खरेदी आपण कोणत्याही मेट्रो स्टेशनवर करू शकतो, तसेच त्याचा टॉपअप देखील मेट्रो स्थानकावर भरणे शक्य आहे. यामध्ये प्रवाशांना मेट्रोमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन ( एएफसी ) गेट्सवर फक्त त्यांचे महाकार्ड टॅप करावे लागते आणि त्याद्वारे प्रवासी भाडे कापले जाते. महाकार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्डमधून वजा केले जाते. ईएमव्ही आधारित स्मार्ट कार्ड ओरिएंटेड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम हे प्रवास भाडे भरण्यासाठी उत्तम उपाय आहे.
मेट्रोद्वारे आजतागायत प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात विशेष करून विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सूट, शनिवार आणि रविवार म्हणजेच विकेंडला विशेष सवलत, दैनिक पास फक्त १०० रुपयात आणि महाकार्ड असल्यास प्रत्येक प्रवासात १० टक्के सूट अशा अनेक ऑफर्स मेट्रोद्वारे प्रवाशांना पुरवण्यात आल्या आहेत. या सुविधांचा प्रवासी मोठ्या प्रमाणावर लाभ देखील घेत असल्याचे दिसून येते.
महाकार्ड आणि एएफसी यामुळे मेट्रोमध्ये प्रवास करणे सोपे आणि स्वस्त देखील झाले आहे. अगदी सुटसुटीत आणि पारदर्शक अशा या सोयीमुळे निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचण्यास टळते. या कार्ड सुविधेमुळे कागदांची आणि त्यावरूनच झाडांची बचत होते तसेच कचऱ्याचे प्रमाण कमी होते. यामुळे मेट्रोच्या सुविधा या पर्यावरणपूरक आहेत असे म्हणायला काही हरकत नाही.
मेट्रो महाकार्ड म्हणजे काय?
मेट्रोतून प्रवास करताना पुरुषांइतकीच किंवा त्याहून जास्त महिलांची संख्या दिसून येते. कारण मेट्रोचा प्रवास महिलांना सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतो. महिलांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यास, कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचवण्यात मेट्रो अत्यंत उपयोगी ठरते. यासोबतच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांच्या आरोग्याला कसल्याही प्रकारची हानी पोहोचू नये यासाठी मेट्रो सेवा देखील तितकीच तत्परतेने कार्य करत असते. याच काळजीच्या हेतूने मेट्रोतर्फे स्पर्श विहीन व्यवस्थापनाकरिता स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन प्रणाली स्वीकारली आहे आणि ही पुण्यातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रवासी महा कार्डचा उपयोग करून कॅशलेस आणि विनास्पर्श, तसेच सवलतींवर सहज सुलभ प्रवास करू शकतात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास ऑफर?
दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. या महिलांच्या विशेष दिवशी त्यांना भेट म्हणून महामेट्रोद्वारे एक अत्यंत कौतुकास्पद ऑफर राबवली जात आहे. १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत महामेट्रो द्वारे महिलांना ५०० रुपयांच्या टॉपअप सह फक्त २० रुपयात मेट्रोचे ‘महाकार्ड’ देण्यात येत आहे. ही ऑफर महिलांकरिता अत्यंत उपयोगी ठरू शकते. ‘महाकार्ड’ हे भारतीय स्टेट बँकच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १,०४,८१६ कार्ड विकले गेले आहेत. ‘महाकार्ड’ मेट्रो भाड्यांवर १० टक्के सवलत प्रदान करते.