Home लेटेस्ट न्यूज पुणे रेल्वे स्थानकावर खराब पदार्थांची विक्री!

पुणे रेल्वे स्थानकावर खराब पदार्थांची विक्री!

by sandy
0 comments

पुणे स्थानकावर ‘आयरसीटीसी’च्या नावाखाली उभारलेल्या स्टॉलवर खराब अन्नपदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. प्रवाशाने वाडा पाव मागितल्यास त्या वाडा पावचा दुर्गंध येत असल्याचे प्रवेशास लक्षात आले. यावरून प्रवाशाने विक्रेत्याला जाब विचारल्यास विक्रेत्याने प्रवाशासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. रेल्वे प्रशासनाचे या बाबींकडे लक्ष नाही का? असा सवाल उठवला जात आहे. 

पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखाहून अधिक लोक प्रवास करत असतात. प्रवाशांना भूक लागल्यास ते जवळपास असलेल्या हॉटेल्स किंवा स्टॉल्सवर जाऊन खाद्यपदार्थ विकत घेऊन खात असतात. यावेळी काही प्रवासी आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेणारे असतात तर काही वेळेचे किंवा परिस्थितीचे गांभीर्य बाळगून दिसेल ते खाऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. ‘आयरसीटीसी’ या नावावर प्रत्येकालाच डोळे झाकून विश्वास असतो कारण याचे सर्व कामकाज रेल्वे प्रशासन पाहत असतो. कुठेही उघड्यावरचे न खाता रेल्वे प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या ‘आयरसीटीसी’च्या नावाने उघडलेल्या स्टॉलवर पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवासी गर्दी करतात. यावेळी एका प्रवाशाने या स्टॉलवरून वडापाव विकत घेतला. तो खायला घेतल्यास त्या प्रवाशाला वडापावचा कुबट वास आला आणि तो शिळा देखील दिसत होता. याविरुद्ध प्रवाशाने स्टॉल चालकास जाब विचारल्यास स्टॉल चालकाने वादाला सुरुवात केली. तो स्टॉल चालक त्याची चूक मान्य करण्यास तयार होत नव्हता. 

हा प्रकार पाहताच पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपच्या सदस्यांनी या घटनेला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या या स्टॉलवर अत्यंत जीवघेणा प्रकार उघडकीस आला आहे. या स्टॉल धारक रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांद्वारे केली जात आहे. 

या प्रकारामुळे अनेक प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. कोणत्या खाद्यपदार्थांच्या हॉटेलवर तसेच स्टॉल्सवर प्रवाशांनी विश्वास ठेवावा हा एक गंभीर प्रश्न सर्वांसमोर येऊन ठाकला आहे. यावर लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे. परंतु तोवर प्रवाशांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. भुकेच्या सपाट्यात आपण कुठलेही उघड्यावरचे अन्न न तपासून घेता तसंच खाणे अत्यंत चुकीचे आहे. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. कुबट वास येणारे अन्न खाल्ल्यास अनेक रोगांना आपण आमंत्रण देऊ शकतो याची जाणीव प्रवाशांनी ठेवावी. 

पुणे रेल्वे स्थानकावर काय घडले?

पुणे स्थानकावर ‘आयरसीटीसी’च्या नावाखाली उभारलेल्या स्टॉलवर खराब अन्नपदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. प्रवाशाने वाडा पाव मागितल्यास त्या वाडा पावचा दुर्गंध येत असल्याचे प्रवेशास लक्षात आले. यावरून प्रवाशाने विक्रेत्याला जाब विचारल्यास विक्रेत्याने प्रवाशासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. रेल्वे प्रशासनाचे या बाबींकडे लक्ष नाही का? असा सवाल उठवला जात आहे. 

आयरसीटीसीच्या नावाने स्टॉलवर खराब खाद्यपदार्थ?

पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखाहून अधिक लोक प्रवास करत असतात. प्रवाशांना भूक लागल्यास ते जवळपास असलेल्या हॉटेल्स किंवा स्टॉल्सवर जाऊन खाद्यपदार्थ विकत घेऊन खात असतात. यावेळी काही प्रवासी आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेणारे असतात तर काही वेळेचे किंवा परिस्थितीचे गांभीर्य बाळगून दिसेल ते खाऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. ‘आयरसीटीसी’ या नावावर प्रत्येकालाच डोळे झाकून विश्वास असतो कारण याचे सर्व कामकाज रेल्वे प्रशासन पाहत असतो. कुठेही उघड्यावरचे न खाता रेल्वे प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या ‘आयरसीटीसी’च्या नावाने उघडलेल्या स्टॉलवर पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवासी गर्दी करतात. यावेळी एका प्रवाशाने या स्टॉलवरून वडापाव विकत घेतला. तो खायला घेतल्यास त्या प्रवाशाला वडापावचा कुबट वास आला आणि तो शिळा देखील दिसत होता. याविरुद्ध प्रवाशाने स्टॉल चालकास जाब विचारल्यास स्टॉल चालकाने वादाला सुरुवात केली. तो स्टॉल चालक त्याची चूक मान्य करण्यास तयार होत नव्हता. 

You may also like

Leave a Comment

Search Here