विस्तीर्ण अवकाशात काय दडले आहे हे पाहण्यास सर्वच उत्सुक असतात. हीच पुणेकरांची उत्सुकता सत्यात परिवर्तित करण्यासाठी महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे. पुणेकरांसाठी ही एक आनंदवार्ता आहे. शालेय विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, विस्तीर्ण पसरलेले अवकाश यांची माहिती सहज-सोप्या शब्दांत अनुभवता यावी यासाठी महापालिकेने सहकारनगरमधील ई-लर्निंग स्कूल मध्ये उभारलेले तारांगण पुन्हा सुरु करण्याचे नियोजीले आहे. तब्बल चार वर्षांनी हे तारांगण सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे अवकाशातील ताऱ्यांचे, ग्रहांचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून महापालिकेद्वारे हे तारांगण उभारण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत गेले, तसेच त्याची दुरुस्ती – देखभाल वेळच्यावेळी झाली नाही. यामुळे गेल्या चार वर्षांपासून हे तारांगण बंद पडले आहे. आता हे तारांगण पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका द्वारे घेण्यात आला आहे. त्यासाठी संस्था नेमण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे ऐकिवात आले आहे.
काही वर्षांपूर्वी बंद झालेले हे तारांगण तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले होते आणि आता बंद झालेले ते तारांगण पुन्हा उभारण्यासाठी ६१ लाख ६५ हजार ५०० रुपये इतका खर्च येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाच वर्ष हे काम चालणार असून त्यासाठी हा खर्च होणार आहे. हे तारांगण सुरु करण्याचे काम संस्थेला देण्यात आले आहे. महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या या तारांगणाच्या कार्याची रूपरेषा विशिष्ट स्वरूपाची आहे. या तारांगणात फुलडोम प्रो या कंपनीचा सर्व्हर व सॉफ्टवेअर बसवण्यात आले होते. परंतु, त्याचा मेंटेनन्स तसेच नूतनीकरण करण्यात आले नाही. यामुळेच हे तारांगण कोरोना कालखंडानंतर इतकी वर्षे बंद पडून होते.
आता हे तारांगण पुन्हा सुरु व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेने हे तारांगण उभारण्यासाठी ज्या कंपनीची मदत घेतली होती पुन्हा त्याच कंपनीशी संपर्क साधला. या कंपनीद्वारे तारांगणाच्या कामासाठी अधिकृतपणे नेमलेल्या संस्थेची माहिती महापालिकेला पुरवण्यात आली आहे. ही कंपनी या तारांगणाची यंत्रणा तपासणार आहे. तसेच सॉफ्टवेअर, हार्डवेअर या महत्वाच्या गोष्टी तपासणे आणि खराब असल्यास त्या दुरुस्त करणे हे सर्व कामकाज पाहणार आहे. पुढील दुरुस्ती तसेच देखभालीचे कार्य याच कंपनीला सोपवण्यात आले आहे.
नेमलेल्या कंपनीद्वारे तारांगणासाठी तब्बल २७ कार्यक्रम नियोजित करण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील हे कार्यक्रम पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला अनुसरून हे तारांगण सुरु करण्यासाठी पहिल्या वर्षी ३३ लाखांचा खर्च करण्यात येणार असल्याचा अहवाल आहे. त्यानंतर पुढील चार वर्ष देखभाल आणि दुरुस्तीसाठी ६ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत खास विद्यार्थ्यांसाठी हे तारांगण सुरु करण्याचे पुणे महानगरपालिकेने नियोजीले आहे.
पुण्यातील तारांगण कधी सुरु होणार?

पुण्याचे तारांगण पुन्हा सुरु करण्यासाठी किती खर्च होत आहे?