Home लेटेस्ट न्यूज पुण्यातील वानवडी भागात सायबर चोरट्यांनी १४ लाख केले लंपास!

पुण्यातील वानवडी भागात सायबर चोरट्यांनी १४ लाख केले लंपास!

by sandy
0 comments

पुण्याच्या वानवडी भागातील एका ज्येष्ठ महिलेस दूरदर्शन संच दुरुस्त करायचे आहे असं सांगून सायबर चोरट्यांनी १४ लाख रुपयांची फसवणूक केली. यावेळी त्या ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्ह्याची तक्रार केली असून सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोालिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रार करणार ज्येष्ठ महिला पुण्यातील वानवडी भागात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. 

दूरदर्शन संच दुरुस्त करायचे आहे असं सांगून सायबर चोरटयांनी एका ज्येष्ठ महिलेला तब्बल १४ लाखांचा गंडा घातला असल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत त्या ६५ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वानवडी भागात राहायला आहेत. त्यांच्या घरातील दूरदर्शन संचात बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांनी दूरदर्शन संच निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातील नंबरवर संपर्क साधला. चोरट्यांनी ग्राहक सेवा केंद्रातील संपर्क नंबरमध्ये फेरफार करुन त्यांचा मोबाइल नंबर तेथे समाविष्ट केला होता. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला. दूरदर्शन संचात बिघाड झाल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवली.

चोरट्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना उपाय म्हणून लिंकमध्ये त्यांना वैयक्तिक माहिती, तसेच बँक खात्याची माहिती पाठवण्यास सांगितले होते. बँक खात्यातील माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून १४ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यात फिरवून घेतले. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने त्वरित पोलीस ठाणे गाडीतलं आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळी या घटनेचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात पोलीस सज्ज झाले आहेत.

सध्या सायबर चोरट्यांना  खात्यातील पैसे चोरताना बँक अकाउंट माहिती किंवा एटीएमची देखील गरज भासत नसल्याचे समोर आले आहे. सायबर चोरटे एक लिंक पाठवून त्यावर क्लिक केल्यास त्वरित बँक खात्यातील पैसे लंपास करण्यास माहीर झाले आहेत. यावेळी कोणत्याही लिंकवर विश्वास ठेवणे घातक ठरू शकते याची बँक अकाउंट धारकांनी दखल घ्यावी. कोणत्याही लिंकवर संशय येताच लिंकवर क्लिक न करता पोलिसांना तक्रार करावी जेणेकरून आपल्यासोबत अशी घटना घडण्याची वेळ येणार नाही. मोबाईल धारकांनी कोणत्याही वेबसाईट वर जाण्यापूर्वी ती लीगल आहे की नाही याची पडताळणी करावी व नंतर त्या वेबसाईटवर आपली माहिती भरावी. कोणतीही माहिती भरण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणे आणि सतर्क राहणे या काळात अत्यंत महत्वाचे ठरत आहे. सायबर चोरटे अत्यंत स्मार्ट झाले आहेत, तसेच आपणही त्यांच्या जाळ्यात न फसण्यासाठी काही बेसिक गोष्टींची दक्षता घेणे उत्तम ठरेल. 

सायबर गुन्हा कुठे झाला?

पुण्याच्या वानवडी भागातील एका ज्येष्ठ महिलेस दूरदर्शन संच दुरुस्त करायचे आहे असं सांगून सायबर चोरट्यांनी १४ लाख रुपयांची फसवणूक केली. यावेळी त्या ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्ह्याची तक्रार केली असून सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोालिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रार करणार ज्येष्ठ महिला पुण्यातील वानवडी भागात राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

नक्की काय घडलं वानवडी सायबर गुन्ह्यात?

दूरदर्शन संच दुरुस्त करायचे आहे असं सांगून सायबर चोरटयांनी एका ज्येष्ठ महिलेला तब्बल १४ लाखांचा गंडा घातला असल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत त्या ६५ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वानवडी भागात राहायला आहेत. त्यांच्या घरातील दूरदर्शन संचात बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांनी दूरदर्शन संच निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातील नंबरवर संपर्क साधला. चोरट्यांनी ग्राहक सेवा केंद्रातील संपर्क नंबरमध्ये फेरफार करुन त्यांचा मोबाइल नंबर तेथे समाविष्ट केला होता. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला. दूरदर्शन संचात बिघाड झाल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवली. 

चोरट्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना उपाय म्हणून लिंकमध्ये त्यांना वैयक्तिक माहिती, तसेच बँक खात्याची माहिती पाठवण्यास सांगितले होते. बँक खात्यातील माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून १४ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यात फिरवून घेतले. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने त्वरित पोलीस ठाणे गाडीतलं आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळी या घटनेचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात पोलीस सज्ज झाले आहेत.

You may also like

Leave a Comment

Search Here