पुण्यात मागील आठवड्यात स्वारगेट बस स्थानकावर घडलेला दुर्दैवी प्रकार अजून क्षमला नसताना पुण्यातच आणखी एक बलात्कार प्रकरण उघडकीस आलं आहे. पुणे जिल्हा, शिरूर तालुक्यातील कारेगाव इथं एका तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या मामाचा मुलगा समोर असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. पुण्यात सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज भासत आहे.
पुण्यात मागील आठवड्यात स्वारगेट बस स्थानकावर अत्यंत घृणास्पद घटना घडली होती. दत्ता गाडे या नराधमाने ताई ताई म्हणत फसवून एका तरुणीवर दिवसा ढवळ्या लोकांची वर्दळ असताना देखील बलात्कार केल्याचे प्रकरण सर्वांच्या मनात भीतीचे घर करून बसले आहे. पुणेकरांमध्ये अजूनही खळबळजनक वातावरण आहे. त्याबाबत पुरेसा खुलासा झाला नसून तेवढ्यातच पुण्यात बलात्काराचे दुसरे प्रकरण घडले असल्याची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कारेगाव येथे राहणाऱ्या आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे ही आरोपींची नावे आहेत. अमोल नारायण पोटे हा मूळचा अहिल्यानगर मधील ढोकराई येथे राहणारा २५ वर्षीय तरुण असून किशोर रामभाऊ काळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील धारूर येथे राहणारा २९ वर्षीय तरुण आहे. या दोन्ही आरोपींनी एका तरुणीवर अत्यंत घृणास्पद अत्याचार केला असल्याची बातमी समोर आली आहे.
या घटनेत नक्की काय घडले याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित तरुणी तिच्या मामाच्या मुलासह म्हणजेच आपल्या मामेभावासह घरापासून थोडी दूर गप्पा मारत बसली होती. तेवढ्यात अमोल पोटे आणि किशोर काळे हे दोन आरोपी मोटार सायकलवर येत होते. त्यांनी गाडी थांबवून ते त्या दोघांपाशी गेले आणि चाकू काढला. चाकूचा धाक दाखवून त्या दोघांनी पीडित तरुणीच्या मामेभावाला जबरदस्ती तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडला आणि त्यावेळी या नराधमांनी फोटो आणि व्हिडीओ देखील घेतले. भावाला मारण्याची धमकी देत त्यांनी आळीपाळीने पीडित मुलीवर अत्याचार केले तसेच गळ्यातील चेन आणि नाकातली फुली देखील जबरदस्ती त्या नराधमांनी काढून नेली.
अमोल पोटे आणि किशोर काळे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजूर केली असल्याची माहिती देखील मिळाली आहे. यावेळी पुण्यात ठिकठिकाणी पोलीस सुरक्षा तैनात करणे अत्यावश्यक ठरत आहे. गेल्या आठवड्यात घडलेला प्रकार अजूनही सर्वाना लक्षात आहे तोच हा दुसरा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पुण्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले असल्याने सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.
पुण्यातील नवे बलात्कार प्रकरण कोणते?
पुण्यात मागील आठवड्यात स्वारगेट बस स्थानकावर घडलेला दुर्दैवी प्रकार अजून क्षमला नसताना पुण्यातच आणखी एक बलात्कार प्रकरण उघडकीस आलं आहे. पुणे जिल्हा, शिरूर तालुक्यातील कारेगाव इथं एका तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या मामाचा मुलगा समोर असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. पुण्यात सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज भासत आहे.
कारेगाव येथे नक्की काय घडले?
या घटनेत नक्की काय घडले याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित तरुणी तिच्या मामाच्या मुलासह म्हणजेच आपल्या मामेभावासह घरापासून थोडी दूर गप्पा मारत बसली होती. तेवढ्यात अमोल पोटे आणि किशोर काळे हे दोन आरोपी मोटार सायकलवर येत होते. त्यांनी गाडी थांबवून ते त्या दोघांपाशी गेले आणि चाकू काढला. चाकूचा धाक दाखवून त्या दोघांनी पीडित तरुणीच्या मामेभावाला जबरदस्ती तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडला आणि त्यावेळी या नराधमांनी फोटो आणि व्हिडीओ देखील घेतले. भावाला मारण्याची धमकी देत त्यांनी आळीपाळीने पीडित मुलीवर अत्याचार केले तसेच गळ्यातील चेन आणि नाकातली फुली देखील जबरदस्ती त्या नराधमांनी काढून नेली.
आरोपींना ताब्यात घेतले आहे का?