Home लेटेस्ट न्यूज पुण्यात होणार नाही पाणी कपात! : विखे-पाटील

पुण्यात होणार नाही पाणी कपात! : विखे-पाटील

by sandy
0 comments

पुणेकरांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणाचा साठा लक्षात घेता पुणे शहराचे पाणी कपात न करता पाणी कायम ठेण्याचा निर्णय शनिवारी पार पडलेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल २१ टीएमसी पाणी महापालिकेला मिळणार असल्याची बाब समोर आली आहे. पाणीपट्टीच्या थकबाकी प्रकरणी जलसंपदा विभागाने दिलेला पाणी कपातीचा इशारा जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी मोडून काढला आहे. 


शनिवार, दि. १ मार्च रोजी घेण्यात आलेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी पुणे शहराच्या पाण्यात कोटीही कपात करणार नसल्याची आनंदवार्ता पुणेकरांना दिली आहे. तसेच, महापालिका जे अतिरिक्त पाणी वापरत आहे त्या पाण्यासंदर्भात देखील जलसंपदा विभाग महापालिके सोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची माहिती यावेळी विखे-पाटील यांनी दिली. पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील पाण्याच्या साठ्यासंदर्भात घेण्यात आलेल्या कालवा समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शहरातील तसेच जिल्ह्यातील आमदार, महापालिका व जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. जलसंपदा विभागाने मंजूर केलेल्या ११.६० टीएमसी पाण्याचा साठा आणि सोबतच महापालिकेतर्फे वापरले जाणारे जादाचे ७.९५ टीएमसी पाणी कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी भामा आसखेड धरणातून एक टीएमसी आणि पवना धरणातून ०.६० टीएमसी पाणी देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 


धरणात सध्या पाणीसाठा योग्य प्रमाणात असल्याने पाणी कपात करण्याची गरज नसल्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. आणि त्याबाबत विखे-पाटील यांनी घोषणा देखील केली. परंतु महापालिकेद्वारे वापरले जाणारे अतिरिक्त पाणी आणि त्यामुळे वाढलेली थकवादी यासंदर्भात मार्च अखेरपर्यंत महापालिका २०० कोटी रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात इतरत्र लोक मोठ्या प्रमाणात येत असून शहरातील लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार अतिरिक्त पाणी द्यावे लागणार आहे. त्यात शहराला जेवढे पाणी पुरवण्यात येते त्यात आणि त्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेत विसंगती आढळत आहे. महापालिकेतर्फे पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असून यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे असल्याचे या बैठकीत ठरले. या विषयावर सर्व आमदार तसेच दोन्ही विभागाचे अधिकारी यांची एकत्रीत बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील पाणी पुरवणे जलसंपदा विभागाचे कर्तव्य आहे. महापालिका अतिरिक्त पाणी वापर करीत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो. शेतकरी याविषयी कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. आणि हे सर्व टाळण्यासाठी या समस्येवर योग्य निर्णय घेणे गरजेचे ठरत आहे. 


यावेळी पाण्याची थकबाकी भरण्यासाठी जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस देखील बजावली आहे. ही थकबाकी न दिल्यास २५ फेब्रुवारीपासून पुण्याच्या पाण्यात कपात करण्यात येईल, असा निर्णय जलसंपदा विभागातर्फे घेण्यात आला होता. यासंदर्भात शनिवारी पार पडलेल्या बैठकीत विखे-पाटील यांनी पुण्यात पाणी कपात होणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे पुणेकरांना सध्या दिलासा मिळाला आहे. 

पुण्यामधील पाणीकपात रद्द?

पुणेकरांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणाचा साठा लक्षात घेता पुणे शहराचे पाणी कपात न करता पाणी कायम ठेण्याचा निर्णय शनिवारी पार पडलेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल २१ टीएमसी पाणी महापालिकेला मिळणार असल्याची बाब समोर आली आहे. पाणीपट्टीच्या थकबाकी प्रकरणी जलसंपदा विभागाने दिलेला पाणी कपातीचा इशारा जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी मोडून काढला आहे.

पुणे महापालिकेतर्फे पाणीपट्टीची किती थकबाकी?

धरणात सध्या पाणीसाठा योग्य प्रमाणात असल्याने पाणी कपात करण्याची गरज नसल्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. आणि त्याबाबत विखे-पाटील यांनी घोषणा देखील केली. परंतु महापालिकेद्वारे वापरले जाणारे अतिरिक्त पाणी आणि त्यामुळे वाढलेली थकवादी यासंदर्भात मार्च अखेरपर्यंत महापालिका २०० कोटी रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात इतरत्र लोक मोठ्या प्रमाणात येत असून शहरातील लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार अतिरिक्त पाणी द्यावे लागणार आहे. त्यात शहराला जेवढे पाणी पुरवण्यात येते त्यात आणि त्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेत विसंगती आढळत आहे. महापालिकेतर्फे पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असून यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे असल्याचे या बैठकीत ठरले. या विषयावर सर्व आमदार तसेच दोन्ही विभागाचे अधिकारी यांची एकत्रीत बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here