Home लेटेस्ट न्यूज मुंबईकरांना उष्णतेपासून थोडासा दिलासा! किमान तापमान होणार कमी… 

मुंबईकरांना उष्णतेपासून थोडासा दिलासा! किमान तापमान होणार कमी… 

by sandy
0 comments

गेल्या काही दिवसात मुंबईत उष्णतेचे प्रमाण खूप वाढले असल्याचे जाणवत आहे. दिवसा तर तापमान जास्त असतेच, परंतु रात्रीचे तापमान देखील वाढले आहे आणि यामुळे नागरिकांना उन्हाळ्याचा त्रास आतापासूनच सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या तापमानाचा पारा हा चढताच राहिला आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांना गारवा जाणवेनासा झाला आहे. पुढील दोन-तीन दिवस किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात येत आहे. 

नव्या वर्षाची सुरुवात अत्यंत उष्ण वातावरणाने झाली असून संपूर्ण फेब्रुवारी महिना हा मुंबईकरांसाठी अत्यंत उष्णतेचा ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यातील काही दिवस सोडल्यास किमान आणि कमाल तापमानाचा पारा हा चढताच होता. यावेळी उष्णतेमुळे मुंबईकर अक्षरशः त्रासले होते. सकाळी तर उन्हाळ्याने मुंबईकरांना ग्रासले होतेच, पण वाढत्या तापमानाचे चटके मुंबईकरांना रात्री देखील सतावत होते. जानेवारी महिन्यात काही दिवस थंड वातावरण अनुभवता आलं, परंतु फेब्रुवारी महिन्यात मात्र अत्यंत उष्ण वातावरण मुंबईत अनुभवायला मिळाले. फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान ३० त ३४ इतके होते आणि किमान तापमानात देखील वाढ होत होती. दर दोन दिवसांनी मुंबईतील तापमान बदलत होते आणि त्यामुळे मुंबईकरांना वाढत्या तापमानाचा सकाळ सोबतच रात्री देखील त्रास सहन करावा लागला होता. 


फेब्रुवारी महिना मुंबईकरांसाठी नव्हे तर संपूर्ण देशभरात फेब्रुवारी महिना हा सर्वाधिक तापमानाचा ठरला आहे. १९०१ पासून ते यंदाचा २०२५ सालातला फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्णतेचा महिना ठरला आहे. मागील १२५ वर्षात या वर्षातील फेब्रुवारी महिन्याने उष्णतेच्या तापमान वाढीत विक्रम मिळवला आहे. 


परंतु हवामान खात्याद्वारे किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे काही दिवस मुंबईकरांना पहाटेचा गारवा अनुभवता येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून रात्रीच्या वेळी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवता येत आहे. पुढील काही दिवस किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील अशी माहिती हवामान खात्याद्वारे देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी, दुपारी काही प्रमाणात उन्हाच्या झळा सहन कराव्या लागू शकतील, परंतु रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र थंड वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. मुंबईच्या तापमानात घट झाली असली तरी देखील यामध्ये अधेमध्ये काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहील. यामुळे उष्णता तर राहील, परंतु मध्येच ढगाळ वातावरण देखील अनुभवायला मिळू शकेल. मार्च महिन्याच्या अखेरीस मात्र तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तवली जात आहे. यामुळे एप्रिल महिना भयंकर उष्णता घेऊन येत असल्याने मुंबईकरांनी याची पूर्वतयारी नक्कीच करावी. 


यावेळी उष्णतेपासून त्वचेची सुरक्षा करण्यासाठी चेहऱ्यावर स्कार्फ किंवा रुमाल बांधणे योग्य ठरेल. तसेच सनस्क्रीन वापरणे उष्णता बाधू नये यासाठी उत्तम ठरेल. शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून सतत पाणी पिणे, कोकम सरबत, नारळ पाणी या गोष्टी आपल्याला उष्णतेचा त्रास होण्यापासून नक्कीच वाचवू शकतील. मुंबईकरांनी या उन्हाळ्यात स्वतःची तसेच कुटुंबीयांची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

मुंबईचे तापमान किती आहे?

हवामान खात्याद्वारे किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे काही दिवस मुंबईकरांना पहाटेचा गारवा अनुभवता येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून रात्रीच्या वेळी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवता येत आहे. पुढील काही दिवस किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील अशी माहिती हवामान खात्याद्वारे देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी, दुपारी काही प्रमाणात उन्हाच्या झळा सहन कराव्या लागू शकतील, परंतु रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र थंड वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. मुंबईच्या तापमानात घट झाली असली तरी देखील यामध्ये अधेमध्ये काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुंबईचे तापमान फेब्रुवारीत किती होते?

फेब्रुवारी महिन्यात मात्र अत्यंत उष्ण वातावरण मुंबईत अनुभवायला मिळाले. फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान ३० त ३४ इतके होते आणि किमान तापमानात देखील वाढ होत होती. दर दोन दिवसांनी मुंबईतील तापमान बदलत होते आणि त्यामुळे मुंबईकरांना वाढत्या तापमानाचा सकाळ सोबतच रात्री देखील त्रास सहन करावा लागला होता. फेब्रुवारी महिना मुंबईकरांसाठी नव्हे तर संपूर्ण देशभरात फेब्रुवारी महिना हा सर्वाधिक तापमानाचा ठरला आहे. १९०१ पासून ते यंदाचा २०२५ सालातला फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्णतेचा महिना ठरला आहे. मागील १२५ वर्षात या वर्षातील फेब्रुवारी महिन्याने उष्णतेच्या तापमान वाढीत विक्रम मिळवला आहे. 

You may also like

Leave a Comment

Search Here