लाडकी बहीण योजनेबाबत शाश्वती!
सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘लाडकी बहीण योजने’चा भाग अनेक महिला आहेत आणि या महिला या ‘लाडकी बहीण योजने’कडे अत्यंत आशेने पाहत असतात. मध्यंतरी या ‘लाडकी बहीण योजने’वर गदा येत होती, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील अडकून होता आणि यामुळे या योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु ८ मार्च या दिवशी महिला दिनानिमित्त फेब्रुवारी तसेच मार्च या दोनही महिन्यांचा हप्ता योजनेतील सहभागी महिलांना देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची वार्ता आहे. यामुळे नागरिकांमध्ये या योजनेबाबत निर्माण झालेला संभ्रम देखील दूर झाला आहे.
सोमवार, दि. ३ मार्च रोजी सुरु झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लाडकी बहीण योजने’बाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने केलेल्या घोषणेत नमूद केल्यानुसार या योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे. दोनही महिन्यांचे प्रत्येकी १५०० या नुसार ३ हजार रुपये रक्कम पात्र महिलांच्या खात्यात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा होण्याची शाश्वती या घोषणेद्वारे देण्यात आली आहे.
वर्षाच्या सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नियमात अनेक बदल करण्यात येत होते आणि याबाबत सक्त कारवाई देखील करण्यात येत होती. पात्र अपात्र महिलांचा गट देखील तयार करण्यात आला आणि त्यानुसार अपात्र असलेल्या जवळजवळ नऊ लाख महिलांना या योजनेतून हद्दपार करण्यात आले होते. तसेच ही योजना कोर्टात देखील चर्चेत होती. यामुळे महिलांचा लाडकी बहीण योजनेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील देण्यात येत नव्हता. यामुळे अनेक महिलांनी अशा देखील सोडून दिली असल्याचे अनेक महिलांनी स्पष्ट केले. परंतु हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारतर्फे एक घोषणा करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आला होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आता महिला दिनानिमित्त दोनही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याने या योजनांच्या लाभार्थी महिलांनी याबाबत शाश्वत राहावे. यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेला या योजनेबाबतचा संभ्रम देखील दूर करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता कधी मिळणार?
सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘लाडकी बहीण योजने’चा भाग अनेक महिला आहेत आणि या महिला या ‘लाडकी बहीण योजने’कडे अत्यंत आशेने पाहत असतात. मध्यंतरी या ‘लाडकी बहीण योजने’वर गदा येत होती, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील अडकून होता आणि यामुळे या योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु ८ मार्च या दिवशी महिला दिनानिमित्त फेब्रुवारी तसेच मार्च या दोनही महिन्यांचा हप्ता योजनेतील सहभागी महिलांना देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची वार्ता आहे. यामुळे नागरिकांमध्ये या योजनेबाबत निर्माण झालेला संभ्रम देखील दूर झाला आहे.
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता का थकला होता?