Home लेटेस्ट न्यूज एचएसआरपी सुरक्षित की असुरक्षित? अनेकांच्या व्यवसायाला यामुळे टाळं!

एचएसआरपी सुरक्षित की असुरक्षित? अनेकांच्या व्यवसायाला यामुळे टाळं!

by sandy
0 comments

राज्यसरकारतर्फे २०१९ पूर्वीच्या सर्वच वाहनांना ‘एचएसआरपी’ म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य केलं आहे. मागील काही दिवसात याचे दर जास्त आकारण्यात येत असल्याची देखील माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात गुजरातहून अनेक पटीने जास्त दर आकारले जात आहेत. आणि या कामाचे कंत्राट हे एका गुजराती कंपनीला दिले असल्याचे आरोप होत आहेत. परंतु याहून अधिक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे या नंबर प्लेटमुळे अनेकांचे या क्षेत्रातले व्यवसाय ठप्प पडण्याची शक्यता निर्माण होत आहे. या एचएसआरपी नंबरप्लेटमुळे हजारो लोकांचा रोजगार देखील बुडणार असल्याची बाब समोर आली आहे. 


एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामुळे सर्व नागरिकांची एकच झुंबड उडाली असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या नंबरप्लेट्स बदलण्याचा निर्णय सरकारद्वारे अचानक का घेण्यात आला असेल याची काळी बाजू उघडकीस आली आहे. ही बाजू अत्यंत दुर्दैवी आहे. या नंबरप्लेटच्या बदलामुळे नंबरप्लेट बनवणारे, रेडियम कोरणारे आणि या व्यवसायाशी संबंधित अनेक लोकांना त्यांचा व्यवसायाला टाळं लावावं लागणार आहे. प्रत्येक शहरात, तालुक्याच्या ठिकाणे असे अनेक नंबरप्लेट बनवणारी दुकान आपल्याला पाहायला मिळतात. २०१९ पासूनच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावली जात होती, परंतु त्यापूर्वीच्या वाहनांना जुनी रेडियमवाली नंबरप्लेट होती. या वाहनांची संख्या जास्त असल्याने या लोकांना काम मिळत होते, परंतु या गुजरात कंपनीसोबत कंत्राट केल्याने हे ही काम बंद होण्याच्या मार्गावर आहे. 
या नंबर प्लेट बदलावण्याच्या कामासाठी सरकारतर्फे काही कंपन्या निवडण्यात आल्या आहेत आणि त्यांना कंत्राट देण्यात आले आहे. त्या कंपन्यांनी आपापले एजंट्स नेमले आहेत. त्यांच्याकडूनच रजिस्टर करून आपल्याला एचएसआरपी नंबर प्लेट बनवून मिळणार आहे, ही नंबरप्लेट बनवण्याची अनुमती इतर कुणालाही नाही किंवा इतर कुठेही ती बनवूनही मिळणार नाही. ही नंबरप्लेट स्क्रू विरहित आहे, म्हणजेच ती न काढता येणाऱ्या स्क्रूसोबत कायमस्वरूपी जोडली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गोष्टी करण्यात येत असल्या तरी या व्यवसायावर आधारित असलेल्या हजारो लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ येणार असल्याची संभावना आहे. 


नंबरप्लेटच्या व्यवसायावर आधारित असणाऱ्या अनेक व्यावसायिकांच्या पोटावर पाय येणार आहे, त्यांचा संसार उघड्यावर पडणार आहे. अनेकांनी व्यवसायाच्या जोरावर कर्ज घेतले आहेत, त्यांच्या मुलांचे शिक्षण आहे, या सर्व गोष्टी त्यांना सांभाळणं अत्यंत कठीण होऊन बसणार आहे. अचानक आपल्या व्यवसायावर गदा येणार हे कळल्यावर त्यांना पुढील वाटचाल कशी करावी हा एक मोठा प्रश्न उरणार आहे. गेली कित्येक वर्ष ही लोक या नंबरप्लेटच्या व्यवसायाच्या जोरावर जगत आहेत. त्यांनी हे कंत्राट आम्हाला द्यावं अशी सरकारकडे मागणी देखील केली आहे. परंतु त्यांना काही सरकारतर्फे दाद मिळत नाही. 

एचएसआरपी चा परिणाम काय होत आहे?

राज्यसरकारतर्फे २०१९ पूर्वीच्या सर्वच वाहनांना ‘एचएसआरपी’ म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य केलं आहे. मागील काही दिवसात याचे दर जास्त आकारण्यात येत असल्याची देखील माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात गुजरातहून अनेक पटीने जास्त दर आकारले जात आहेत. आणि या कामाचे कंत्राट हे एका गुजराती कंपनीला दिले असल्याचे आरोप होत आहेत. परंतु याहून अधिक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे या नंबर प्लेटमुळे अनेकांचे या क्षेत्रातले व्यवसाय ठप्प पडण्याची शक्यता निर्माण होत आहे. या एचएसआरपी नंबरप्लेटमुळे हजारो लोकांचा रोजगार देखील बुडणार असल्याची बाब समोर आली आहे.

एचएसआरपी म्हणजे नक्की काय?

एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या नंबर प्लेट बदलावण्याच्या कामासाठी सरकारतर्फे काही कंपन्या निवडण्यात आल्या आहेत आणि त्यांना कंत्राट देण्यात आले आहे. त्या कंपन्यांनी आपापले एजंट्स नेमले आहेत. त्यांच्याकडूनच रजिस्टर करून आपल्याला एचएसआरपी नंबर प्लेट बनवून मिळणार आहे, ही नंबरप्लेट बनवण्याची अनुमती इतर कुणालाही नाही किंवा इतर कुठेही ती बनवूनही मिळणार नाही. ही नंबरप्लेट स्क्रू विरहित आहे, म्हणजेच ती न काढता येणाऱ्या स्क्रूसोबत कायमस्वरूपी जोडली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गोष्टी करण्यात येत असल्या तरी या व्यवसायावर आधारित असलेल्या हजारो लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ येणार असल्याची संभावना आहे. 

You may also like

Leave a Comment

Search Here