Home लेटेस्ट न्यूज घोडबंदर येथे धूळ आणि वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त!

घोडबंदर येथे धूळ आणि वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त!

by sandy
0 comments

ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्त्याच्या जोडणीसोबतच रस्त्याच्या कडेला खोदकाम आणि अनेक कंस्ट्रक्शनची कामे सुरु असल्याने धूळ उडण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे तेथील रहिवाशी त्रस्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सर्व्हिस रोड म्हणजेच सेवा रस्त्याच्या जोडणीबरोबरच रस्त्याच्या कडेला मोठ्या गटारांच्या बांधणीची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदकाम सुरु आहे. या सतत चाललेल्या कामामुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे आणि ही धूळ उडू नये यासाठी काही प्रयत्न देखील करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणचे नागरिक या धुळीमुळे अत्यंत त्रासलेले आहेत.

ठाणे शहरातील वाहतूक या घोडबंदर आणि मुंबई-नाशिक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होत असते. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो मार्ग उभारणीचे काम सुरु आहे. त्यासोबतच घोडबंदर येथील कासारवडवली चौकात उड्डाणपूल उभारणीचे काम देखील सुरु आहे. हे सर्व काम या रस्त्यावरील रोजची वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी केले जात आहे परंतु, यामुळे दोनही मार्ग अरुंद झाले आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे इथे ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषणामुळे सर्वच नागरिक त्रस्त आहेत. 

हे काम माजिवडा ते ओव्हलपर्यंत करण्यात येत आहे. या कामांसाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. त्याजागी काँक्रीटची गटारे बांधण्यात येत आहेत. या कामामध्ये या ठिकाणी पुरेशी काळजी घेण्यात येत नाहीये असे चित्र दिसून येत आहे. ही बाब ठाणे महापालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे लक्षण घेण्यात यावी. हे नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक तसेच आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. 

घोडबंदर येथे कोणत्या प्रकारचे काम होत आहे?

ठाणे शहरातील वाहतूक या घोडबंदर आणि मुंबई-नाशिक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होत असते. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो मार्ग उभारणीचे काम सुरु आहे. त्यासोबतच घोडबंदर येथील कासारवडवली चौकात उड्डाणपूल उभारणीचे काम देखील सुरु आहे. हे सर्व काम या रस्त्यावरील रोजची वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी केले जात आहे परंतु, यामुळे दोनही मार्ग अरुंद झाले आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे इथे ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषणामुळे सर्वच नागरिक त्रस्त आहेत.

ठाण्यातील घोडबंदर येथे वाहतूक कोंडीचे कारण काय?

ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्त्याच्या जोडणीसोबतच रस्त्याच्या कडेला खोदकाम आणि अनेक कंस्ट्रक्शनची कामे सुरु असल्याने धूळ उडण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे तेथील रहिवाशी त्रस्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सर्व्हिस रोड म्हणजेच सेवा रस्त्याच्या जोडणीबरोबरच रस्त्याच्या कडेला मोठ्या गटारांच्या बांधणीची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदकाम सुरु आहे. या सतत चाललेल्या कामामुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे आणि ही धूळ उडू नये यासाठी काही प्रयत्न देखील करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणचे नागरिक या धुळीमुळे अत्यंत त्रासलेले आहेत.

You may also like

Leave a Comment

Search Here