Home लेटेस्ट न्यूज दैव जाणीले कोणी? लग्नाच्या सोळा वर्षांनंतर जुळ्या बाळांचा जन्म, अवघ्या तीन तासांतच आईचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

दैव जाणीले कोणी? लग्नाच्या सोळा वर्षांनंतर जुळ्या बाळांचा जन्म, अवघ्या तीन तासांतच आईचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

by sandy
0 comments

जळगाव पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशी ज्योती चौधरी (वय अंदाजे ३७ वर्षे) या महिलेने लग्नाच्या १६ वर्षानंतर दि १९ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पाचोरा शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा अश्या दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. दोन्ही बाळं जन्माला येताच ३ तासांतच बाळाला जन्म देणाऱ्या आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला. लग्नाच्या तब्बल १६ वर्षांनंतर मातृत्व पदरी पडलेल्या मातेच्या अशा जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जुळ्या बाळांना जन्म देऊन प्रसुतीनंतर अवघ्या तीन तासांनी मातेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावातील पाचोरा येथे घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्न होऊन १६ वर्षानंतर दोन जुळे बाळ जन्माला आले. घरात एकीकडे आनंद तर दुसरीकडे आईच्या मृत्यूचे दुःख पसरले होते. ज्योती चौधरी यांनी दोन बाळांना जन्म दिला आणि तीन तासानंतरच बाळांच्या आईचा मृत्यू झाला या घटनेने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.

पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशी ज्योती चौधरी (वय अंदाजे ३७ वर्षे) या महिलेने लग्नाच्या १६ वर्षानंतर दि १९ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पाचोरा शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा अश्या दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. दोन्ही बाळं जन्माला येताच ३ तासांतच बाळाला जन्म देणाऱ्या आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला. लग्नाच्या तब्बल १६ वर्षांनंतर मातृत्व पदरी पडलेल्या मातेच्या अशा जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ज्योती चौधरी यांच्या लग्नाला सोळा वर्ष पूर्ण झाले होते. सोळा वर्षांपासून त्यांचा बाळासाठी औषध उपचार सुरू होता. लग्नाला सोळा वर्षे होऊन देखील बाळ जन्माला येत नसल्याने आयुष्यात निराशा होती. म्हणून मागील अनेक वर्षांपासून ज्योतीच्या परिवाराने नाशिक येथून वैद्यकीय उपचार घेतले होते. त्या अनुषंगाने योग्य उपचार घेतल्याने त्यांचा आई होण्याचा आनंद गगनाला भिडणारा होता.

ज्योतीने दिनांक १९ मार्च २०२५ रोजी एक मुलगा व एक मुलगी अशा दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. याचा परिवाराला खूप आनंद झाला. परंतु बाळंतपणाच्या तीन तासानंतर लगेचच त्या आनंदाला विरजण लागलं. दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्योतीताईंचे निधन झाले. एकीकडे, इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर झालेल्या दोन लहान जुळ्या मुलांचा जन्म. तर दुसरीकडे, त्याच जुळ्या मुलांच्या आईच्या मृत्यूने मन हेलवणारी घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिवारने मोठा आक्रोश केला.

You may also like

Leave a Comment

Search Here