61
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी रायगडाच्या पायथ्याशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन दिनांक 21 मार्च ते 24 मार्च पासून सुरू करणार आहे. या आंदोलनाद्वारे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफी करणार असे सांगितले होते ते अजून केलेले नाही. माजी आमदार बच्चू कडू यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या या पावलामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा वाढण्याची शक्यता आहे.