दौंड : सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2025 दरम्यान अँड राहुल दादा कुल यांनी महत्त्वाचा मुद्दा घेत कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील दोन कारखान्यांमध्ये एमडी सारख्या अमली पदार्थांचे उत्पादन सुरू असून ते उघड झाले आहे त्यांच्यावर संबंधित यंत्रणांनी कारवाई केली असली तरी सर्व ग्रामीण भागात नशेच्या पदार्थाचे जास्त प्रमाण वाढत आहे. यामध्ये लहान लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नशेच्या आहारी जात आहे. ग्रामीण भागात कटिंग पान माध्यमातून अमली पदार्थाची विक्री होत असून भरपूर मोठ्या प्रमाणात तरुणाई नशाच्या आहारी जाण्याची आणखी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात या पार्श्वभूमीवर एडवोकेट राहुल दादा कुल यांनी शासनाने कठोर निर्बंध लागू करून ह्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी व लहान मुलांपासून अमली पदार्थाच्या विळख्यात अडकल्यास त्यांच्या सेवनामुळे मृत्यूची शक्यता नाकारता येत नाही.
अमली पदार्थ निर्मिती व विक्री रोख यासाठी कडक कारवाईची मागणी-अँड.राहुलदादा कुल
92