चक्क नागरिकांना मिळत आहे गटारीचे दूषित पाणी
मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे कालपासून मुक्ताईनगर शहरांमध्ये ज्या ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा झाला त्या भागामध्ये चक्क पाण्यातून दूषित वास येत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
ह्या दूषित पाण्यामुळे किती नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे हे आता येणारी वेळच सांगणार आहे.
आधीच स्वच्छ पाणी न मिळत असल्याने त्याच्यामध्ये ह्या दूषित पाण्याचा पुरवठा हा शहरासाठी जीवघेणा ठरणार आहे.
आज सकाळच्या सुमारास प्रभाग क्रमांक 13 मध्ये पाणीपुरवठा करण्यात आला त्या पाण्यापासून अक्षरशः घाण वास व पिवळसर रंगाचे पाणी आल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. कशातच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत साथीचे आजारपण सुरू झालेले आहेत मुक्ताईनगर करांना आयुष्यात कधीतरी चांगले स्वच्छ पाणी मिळणार का हे सर्व नागरिक प्रश्न विचारत आहे.